जिल्हा परिषद शाळेतील अकरा मुलांना जेवणातून विषबाधा
ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
गोंडपिपरी : तालुक्यात येणाऱ्या चेक बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल शाळेतील शिक्षकांनी वढोली मार्गावर असलेल्या इको पार्क मध्ये नेली. सहलीत 52 विद्यार्थी होते. पार्कमध्ये विद्यार्थ्यांना बायलर चिकन खाऊ घातल्या गेल. यामुळे दहा विद्यार्थ्यांना फ्रुट पायाजन झाल्याने उलट्या होऊ लागल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालय गाठले.
विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असताना याची माहिती पालकांना देणं गरजेचं होत. मात्र शिक्षकांनी पालकांना माहिती दिल्या नसल्याचं पालकाच म्हणणं आहे.
समीरा वेलादी, संस्कार झाडे, रवली शेंडे, आरती आत्राम, टिना बोरकुटे, खुशाल बोरकुटे, भारत झाडे, रुद्रमनी वेलादी, क्रिश वेलादी, आदित्य वेलादी या विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली असल्याने गोंडपिपरी येथील रुग्णलात आणण्यात आले.
मुख्यधापक रमेश पेंदोर सहायक शिक्षक गेडाम यांनी निसर्गरम्य ठिकाणावर सहल नेली. तिथं शाकाहारी अन्न विद्यार्थ्यांना खाऊ घालायला हवं होतं मात्र शिक्षकानी चक्क बायलर चिकन आणून त्या ठिकाणी जेवण तयार करून विद्यार्थीना दिलं. त्यामुळे विद्यार्थीना जेवणातुन विष बाधा झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शिक्षक दारूच्या नशेत असल्याने पालकानी संताप केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू रुग्णालयात पोहचले. पुढील तपास सुरू आहे.
पालकांची सभा घेऊनच सहल नेली गरजेचे होते. शिक्षक दारू पिऊन असल्याने त्याची मेडिकल तपासणी केली आहे. या प्रकरणाची चोकशी करून योग्य ती कारवाही करू असे शिक्षणअधिकारी समाधान भासारकार यांनी सांगितले.