घुग्घुस शहरातील न्यू रेल्वे सायडिंग पुल वाहतुकीसाठी बंद
घुग्घुस शहरातील न्यू रेल्वे सायडिंग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सायकल व पायदळ चालणाऱ्या नागरिकांसाठी हा पुल सुरु राहणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक कृष्णनंद राय यांनी दिली आहे. यामुळं या पुुलावरून दुचाकीस्वरांनी मार्गक्रमण करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
घुग्घुस शहरातील हा पुल अत्यंत जुना असुन पुल कमजोर झाला आहे.या पुलाची डागडुजी करणे आवश्यक असुन रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नुकताच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजच्या स्लॅब कोसळला.प्रवासी चालत जात असताना अचानक एच स्लॅब कोसळून १५ ते २० प्रवासी जख्मी झाल्याची घटना घडली होती.
घटनेची पुनरावृती होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने हा फुल दुचाकी वाहतुकासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुलावरून फक्त सायकल स्वार व पायदळ जाणाऱ्या नागरिकांसाठी खुला असनार आहे.