Home चंद्रपूर संविधान दिनानिमित्त अभिवादन आणि सेवाभावाचे प्रतिकात्मक कार्य

संविधान दिनानिमित्त अभिवादन आणि सेवाभावाचे प्रतिकात्मक कार्य

0
245

संविधान दिनानिमित्त अभिवादन आणि सेवाभावाचे प्रतिकात्मक कार्य

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडवा – अपक्ष उमेदवार पुष्पाताई रामटेके

 

आज दि. २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त घुग्घुस प्रभाग क्रमांक ०४ केमिकल वार्ड येथील सिध्दार्थ बौद्ध विहारात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विहार परिसरातील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी एक सुंदर उदाहरण सादर केले.

घुग्घुस शहरात संविधान रॅली काढण्यात आली आणि प्रभाग ०४ सिद्धार्थ बौद्ध विहारात येवुन सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली.तसेच संविधान दिनानिमित्त मनोगत व्यक्त करण्यात आले.

सर्वप्रथम संविधान दिनानिमित्ताने या प्रसंगी महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली.

संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! अधिकारांचे आकाश आणि कर्तव्यांची जमीन, भारताचे संविधान हीच प्रत्येक भारतीयाची खरी ओळख आहे. शहीदांच्या रक्ताच्या शाईतून हे संविधान बनले आहे,रोज जपून ठेवा, कारण यातूनच आपला देश महान बनला आहे! संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अपक्ष उम्मेदवार सौ.पुष्पाताई रामटेके यांनी सर्वप्रथम घरी भारतीय संविधान पुस्तकाला व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही हात जोडून नमन करण्यात आले.तसेच विहारात दहशतवादी हल्ल्यात शहिदवीर झालेले पोलीस ऑफिसर अशोक कामटे, तुकाराम ओंबळे, विजय साळसकर, हेमंत करकरे व संदीप उन्नीकृष्णन यांच्या बलिदानाला सलाम करत दोन मिनिट मौम करण्यात आले.

पुष्पाताई रामटेके मनोगत व्यक्त करीत मनाले आता पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक चालु झाले, मी अपक्ष सामान्य महिला माझ सौभाग्य कि आज संविधान दिवस मनापासुन मला आज प्रचार करायला आज मला चिन्ह (कंगवा) मिळाल मी सर्वसाधारण महिला नगरसेविका करिता प्रचार करण्यात येत आहे.
मी निष्ठावंत जनतेने मला निष्ठावंत निवडून दिले तर,मी हर समाजाचे एक माणुसकीच्या नातान काम करील निवडून नाही आले तरी समाजसेवा करीत राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!