पतंजली योग समिती साधकांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता योगाच्या माध्यमातून समाजासाठी महानकार्य – माजी आमदार सुदर्शन निमकर
पतंजली योगपीठ हरिद्वार द्वारा संचालित पतंजली योग समिती, महिला योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, किसान सेवा समिती, युवा-युवती संघटन, राजुरा जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा येथील भवानी माता मंदीर सभागृहात आज दि.०५.०१.२०२२ रोजी “स्थापना दिवस व संकल्प दिवस” या कार्यक्रमात मुख्य अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पतंजली योग समित्यांचे साधक आरोग्य सुदृढ राहण्याकरिता योगाच्या माध्यमातून समाजासाठी महानकार्य करीत असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी आमदार वामनराव चटप, प्रमुख अतिथी शिवाजी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.संभाजी वारकड, पुंडलिकराव उराडे, एम. के. सेलोटे, प्रा. हरिभाऊ डोरलीकर सौ. पुष्पाताई गिरडकर, सत्यपाल साळवे, विलास झाडे, कू.भैरवी साळवे व साधक साधिका उपस्थित होते. याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यास चे तालुका प्रभारी पुंडलिकराव उराडे यांच्या जन्मदिना प्रीत्यर्थ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी निरोगी दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.