प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न

0
781

प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न

घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी घुग्घुसचा ३ रा वर्धापन दिन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात २४ डिसेंबरला थाटात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या अध्यक्षा किरण बोढे, माजी जिप सदस्या नितु चौधरी, भाजपाचे अमोल थेरे, पूजा दुर्गम, साजन गोहने, मल्लेश बल्ला, लक्ष्मण ठाकरे, अमीना बेगम, नझीमा कुरेशी, पांडुरंग थेरे, शंकर रामीलवार, गणेश कोयडवार उपस्थित होते.

प्रास्ताविकतेत प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ची स्थापना करण्यात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे मोठे योगदान आहे. कदाचित चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच सोसायटी असावी जिची स्थापना होताच जवळपास तीन हजाराच्या वर सदस्य संख्या होती. या सोसायटीमध्ये दोन हजारांच्या जवळपास मिनी आरडी सुरु आहे. एक हजारांच्या जवळपास मासिक आरडी सुरु आहे. फिक्स डिपॉजिट मोठ्या प्रमाणात आहे आणि तीन कोटी पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले आहे. आता पर्यंत तीन वेळा सोसायटीचे ऑडिट झाले असून ही सोसायटी प्रगती पथावर आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना विवेक बोढे म्हणाले, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करून आत्मनिर्भर व्हावे. बचत गटांनी नवीन संकल्पना करून कार्यकरावे. आता पर्यंत तिन कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले असून भविष्यात पाच कोटी कर्ज वाटपाचे लक्ष आहे. सभासदांच्या सहयोगामुळेच पतसंस्था मोठी झाली आहे.

ही नवीन पतसंस्था डॉ. सोनारकर कॉम्प्लेक्स तहसील कार्यालय समोर, घुग्घुस येथे सन २०१९ ला स्थापन करण्यात आली होती. तेव्हा या पतसंस्थेत एकूण २,२४३ सदस्य होते. मध्य मुदती, लघु मुदती, दीर्घ मुदती, गृह, सोने तारण असे कर्ज देण्यात येत असून महिला बचतगटासाठी व्यवसाय कर्ज, प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना लाभ प्रत्येक सदस्यांसाठी मिळणार आहे. दैनंदिन बचत खाते, फिक्स डिपॉजिट, वाहन कर्ज, वीज देयकाचा भरणा केला जातो. या पतसंस्थेने कात टाकली आहे. संचालन सुचिता लुटे यांनी केले तर आभार वैशाली ढवस यांनी मानले.

यावेळी सुनीता पाटील, सुमन वराटे, संगीता जेऊरकर, शीतल गौरकार, ललिता गाताडे, तारा बोबडे, रुंदा कोंगरे, दुर्गा जुमनाके, सुनीता घिवे, वंदना मुळेवार, प्रांजली वडस्कर, अर्चना लेंडे, पुष्पा रामटेके, प्रीती बोबडे, वसुधा भोंगळे, सुनीता वर्मा, दीपा श्रीवास्कर, निशा उरकुडे, सीमा पारखी, सुरेखा डाखरे, प्रीती धोटे, लता आवारी, सुनंदा लिहीतकर, किशोर बोन्डे, रमेश कौरासे, राजकुमार मुळेवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here