स्वराज्य आधार फॉउंडेशन राजुरा तर्फे हत्तीरोग FTS टास सर्वेक्षण व NCD तपासणी कार्यक्रम संपन्न
राजुरा – आज दि.23-12-2022 रोजी स्वराज्य आधार फॉउंडेशन राजुरा व उपजिल्हा रुग्णालय राजुरा यांच्या वतीने शिव ऑप्टीकल्स, महात्मा फुले चौक, राजुरा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक, राजुरा येथे हत्तीरोग FTS टास सर्वेक्षण व NCD तपासणी चा कार्यक्रम घेण्यात आला. शिबिरामध्ये हत्तीरोगाच्या 180 किट तपासणी झाल्या व त्या मध्ये 5 positive रुग्ण आढळले व NCD ची 123 रुग्ण तपासणी झाली.
यावेळी उपस्थित डॉ. सम्रिन शेख, आदित्य लाकडे (WHO), प्रदीप हंबर्डे (MTS), अंकुश जाधव (HA), एस. एस. चिडे (HA), राहुल धानोरकर (SFW), बी. टी. आत्राम (प्रभारी आ.सह), के.एस. जोरावार (LSO), एस.ठाकरे (LSO), ए.एम.ताडे (आ.कर्म ), एस.बी.कुकुडे (आ.कर्म), एल.सोमनकर (कि. एस), रोशनी नगराळे, मधुकर बोबडे, सुनील चापले यांच्या सोबत सर्व सहकारी व कर्मचारी आणि स्वराज्य आधार फॉउंडेशन राजुरा चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.