वैराग्यमूर्ती गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले संत – माजी आमदार सुदर्शन निमकर
राजुरा : वैराग्यमुर्ती गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा असल्याचे मत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी किसान वॉर्ड राजुरा येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यतिथी सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.
राजुरा येथे श्री गणेश मंदीर देशपांडे वाडी किसान वार्ड राजुरा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा च्या वतीने कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, परिट-धोबी समाज मंडळा चे अध्यक्ष राजकुमार चिंचोलकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे दादाजी झाडे, लटारु मत्ते, प्रभाकर बोभाटे, बाळा गोहोकार, अनिल चौधरी, गजानन बोढे, सुभाष पावडे, मनोहर बोबडे, शैलेश कावडे, रामदास चौधरी, नरेंद्र मोहारे, रत्नाकर नक्कावार, अनिता बोभाटे, अर्चना आगलावे, ज्योती कामतकर, लता ठाकरे, बोढे ताई सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकताना सांगितले की माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.