श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍या वतीने कॅन्‍सर मार्गदर्शन शिबीर

0
646

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍या वतीने कॅन्‍सर मार्गदर्शन शिबीर

९ ते २० वयोगटातील मुलींना एचपीव्‍ही वॅक्‍सीनेशन व गर्भाशयाचा मुखरोग आणि महिलांचे इतर कर्करोग या आजारावर डॉ. धनंजया सारनाथ यांचे मार्गदर्शन लाभणार

मानवी जीवन अत्‍यंत सुंदर आहे. ते सर्वांगसुंदररित्‍या स्‍वतःसाठी व आपल्‍या आप्‍तजनांसाठी जगता यावे, यासाठी आपण कायम प्रयत्‍नशील असतो. परंतु कधी– कधी आपल्‍या आयुष्‍यामध्‍ये एखादा दुर्धर आजार येतो. जो मानवी शरीराला हानी पोहचवितो. अशा आजारांची पूर्व कल्‍पना आली नाही, तर हे आजार बरे होत नसतात. परंतु अशा आजारांवर जनजागृतीच्‍या माध्‍यमातुन आजार होवू नये याकरिता पूर्व काळजी घेतल्‍यास आपण समृध्‍द आयुष्‍य जगू शकतो. अशा आजारांना प्राथमिक स्‍तरावर अटकाव केला, तर आपले आयुष्‍य आपण आनंदमयरित्‍या जगू शकतो. याकरिता ‘मानव सेवा हीच ईश्‍वर सेवा’ मानून सातत्‍याने रूग्‍णसेवेचे व्रत कायम जोपासणारे राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२.०० वा. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय हॉस्‍पीटल वार्ड चंद्रपूर येथे श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था व कॅन्‍सर पेशंट ऐड असोशिएशन मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ९ ते २० वयोगटातील मुलींना एचपीव्‍ही वॅक्‍सीनेशन व गर्भाशयाचा मुखरोग आणि महिलांचे इतर कर्करोग या आजारावर रिसर्च स्‍टडी अॅन्‍ड अडीशनल प्रोजेक्‍ट कॅन्‍सर पेशंट ऐड असोशिएशन मुंबईच्‍या कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये रूग्‍णसेवेचे कार्य मागील अनेक वर्षांपासून श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. या शिबीरांचा शहरी व ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब नागरिकांनी सातत्‍याने लाभ घेतला आहे. या कॅन्‍सर मार्गदर्शन शिबीराचा लाभ सर्वांनी घ्‍यावा, अशी विनंती संस्‍थेच्‍या वतीने सचिव राजेश सुरावार, शैलेंद्रसिंह बैस यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here