वृंदावन नगर येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणार – आ. किशोर जोरगेवार

0
610

वृंदावन नगर येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणार – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांची वृंदावन नगर येथील विकास कामांबाबत बैठक

 

वृंदावन नगर येथील विकासकामांसाठी मोठा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. 60 लक्ष रुपयांच्या निधीतुन येथे रस्ते व नाल्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता येथील 10 रस्ते बनविण्याची मागणी आली आहे. यासाठीही आपण निधी उपलब्ध करुन देऊ सोबतच वृंदावन नगर येथे आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

वृंदावन नगर येथील नागरिकांसह बैठक घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील विकासकामांबाबत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना नागरिकांना येथील विकास कामे प्राधाण्याने करण्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी आश्वस्त केले आहे. यावेळी माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, यंग चांदा ब्रिगेडचे राकेश पिंपळकर, विलास वनकर, वसंतराव ताजणे, मधुकर गोहणे, मनोहर उरकुडे, बाळकृष्ण पाणसे, सचिन खेडेकर, सुमित ढोले, माया खेडेकर, सविता गोदणे, ममता ढोले यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरात अनेक नवीन वस्त्या स्थापीत झाल्या आहे. येथे अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे या भागातील विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. वृंदावन नगर येथील नागरिक जागृत आहे. येथील विकासाबाबत त्यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो. आज येथील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आपण बैठक आयोजित केली. याबाबत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील नागरिकांचे कौतुक केले. येथील रस्ते बणविण्याची मागणी आपल्याकडे आली होती. यासाठी 60 लक्ष रुपये देण्याची घोषणा मी केली होती. आता या निधीतुन येथील दोन रस्ते तयार झाले आहे. असे असले तरी येथील अनेक विकासकामे अद्याप बाकी आहे. येथील 10 रस्ते आणखी तयार करायचे आहे. यासाठी आपण येथील निधी उपलब्ध करुन देऊ सोबतच रखडले असलेले अमृत कलश योजनेचे काम, स्टीट लाईट, पोल लाईट, स्वच्छता आदी कामे येत्या काळात येथे आपण करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी स्थानिकांनी केलेल्या सुचनांचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी दखल घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here