बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील फुट ओव्हर ब्रिज कोसळल्याच्या घटनेची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ घेतली दखल
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना चौकशी चे आदेश
बल्लारपूर/रोहन कळसकर : आज दिनांक 27 नोव्हेंबर रविवार ला बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील फुट ओव्हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने या घटने मध्ये जवळपास 10 ते 15 जखमी झाल्याचे प्रथम दर्शनी कळलेले आहे. या सर्व जखमींना तातडीने मदत करीत आहेत. रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासना ने रुग्णवाहिका च्या माध्यमातून घटने स्थळावरून जखमी झालेल्या रूग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिळताच त्यांनी घटनेची ताबडतोब दखल घेऊन सर्व जखमी रुग्णाना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन ला दिले आहे. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुध्दा दिलेले आहे.
या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर येथील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर जखमी झालेल्या रुग्णाना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी महाराष्ट्र शासन स्तरावरून मदत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असे आश्वासन चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.