Home गडचिरोली कार्मेल ॲकॅडमी चामोर्शी येथे बालकदिन मोठ्या उत्साहात साजरा

कार्मेल ॲकॅडमी चामोर्शी येथे बालकदिन मोठ्या उत्साहात साजरा

0
218

कार्मेल ॲकॅडमी चामोर्शी येथे बालकदिन मोठ्या उत्साहात साजरा

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती थाटामाटात केली साजरी

चामोर्शी, सुखसागर झाडे

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, १४ नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो. नेहरूंना मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि त्यांना मुले प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत असत, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी साजरा केला जातो.

बालदिनाचे विशेष महत्त्व:-

प्रेरणादायी व्यक्तिमत्व: पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे महत्त्वाचे नेते होते आणि त्यांना मुलांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या मते मुले ही देशाचे भविष्य आहेत.
शिक्षणावर भर: नेहरूंनी बाल विकास आणि शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. त्यामुळे, बालदिन हा दिवस मुलांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
चाचा नेहरू: त्यांच्या मुलांवरील प्रेमामुळे आणि त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत असल्याने, हा दिवस त्यांच्या कार्याची आणि स्मृतीची आठवण करून देतो.

बालदिनाचे आयोजन:-

कारमेल शाळा आणि इतर संस्थांमध्ये या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमांमधून मुलांचे कौतुक केले जाते आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
हा दिवस मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे.
बालदिन जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन, ज्याला ‘बाल दिवस’ असेही म्हणतात, भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
मुले देशाचे भविष्य आहेत म्हणून त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि…
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाल विकास आणि शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्या अनुषंगाने त्यांच्या सन्मानार्थ आज 14 नोव्हेंबर रोजी कार्मेल ॲकॅडमी, हायस्कूल(काॅन्वेट) चामोर्शी येथे बालकदिन साजरा करण्यात आला.
विविध नृत्य,गायन,भाषन ,ड्रामा अशा रंगारंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बालकांचं मनोबल तसेच त्यांच्या वर असलेल्या अतुल्यनीय प्रेमाचं प्रतीक म्हणून विद्यार्थी बालंकाच्या गौरवार्थ म्हणून अध्यापक वर्गांनी अतिशय उत्कृष्ट सामुहिक नृत्य सादर करीत कार्यक्रमाचा आरंभ केला.
ॲकेडमीतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध सुप्त अंगीकारी कलांचे प्रदर्शन करून मोठ्या थाटामाटात, मोठ्या उर्जेबल उत्साहाने बालक दिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी केली.
यावेळी सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. फॉ. बेंनी मुकुललं सी एम आय, फॉ. सभास्टीन वायलील सी एम आय
प्रिन्सिपॉल फॉ. जिल्सन वर्ग्हिस सी एम आय, कार्मेल ॲकॅडमी चे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!