कॅन्सर आजारावर सावधगिरी बाळगा : डॉ सुमित पांडे
मुल :-
कोरोना या महामारीने सद्या अख्या महाराष्ट्रात थैमान घातले असून कोरोना मध्ये सावधगिरी बाळगल्यास आजार कायमचा बरा होतो. यात मनुष्य दगावण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र या उलट कॅन्सर या आजाराने रुग्ण मोठ्या प्राणावर दगावत असल्याचे निदर्शनास येत आहे. तंबाखू, खर्रा या सेवनामुळे लहानग्यापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाचा कॅन्सर दिसून येत आहे. त्यावर थातुरमातुर उपचार आणि निष्काळजीपणा मुळे मनुष्य दगावण्याची शक्यता अधिक बळावली असून मृत्यु होत आहे. यात महिलांचा ही समावेश आहे. व्यसनाधीन समाजामुळे कॅन्सर अधिक बळावतोय याला आळा घालणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्सर आजाराची सौम्य लक्षने दिसताच उपचार करून सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. दिवसेंदिवस संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे. कोरोना प्रमाणे कॅन्सर आजाराची सुद्धा लक्षणे दिसताच काळजी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्रामपंचायत भादुरणी येथील कॅन्सर मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. सुमित पांडे यांनी व्यक्त केले.
त्याच प्रमाणे महिलांमध्ये स्तन कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सर चे प्रमाण सुद्धा अधिक गडद होत असल्याने शारीरिक स्वच्छेतेवर अधिक भर देऊन याला आळा घालता येऊ शकते. त्यावर उपचार करून कॅन्सर हा आजार बरा होतो असे मत आशिष तुपासे यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हात टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यांचा संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर हा महिना स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत भादुरणी येथे कॅन्सर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्या पाल जिल्हा समन्वयक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, दिपीका शेंडे माजी सरपंच, सुखदेवे आरोग्य सेविका उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस व गावातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी महात्मा फुले वाचनालय येथील मुलांनी परिश्रण घेतले.