जनतेचा कौल जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या समर्थनार्थ- शेख नईम

0
499

जनतेचा कौल जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या समर्थनार्थ- शेख नईम

झाकीर हुसैन

यवतमाळ । यवतमाळ चे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या विरोधात व जिल्हाधिकारी एम डी सिंह यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील १३५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामुहिक राजिनामें देणार असल्याचे सांगितले होते.
त्यांच्या या मागणीला जिल्ह्यातील तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांनी सुध्दा समर्थन जाहीर केले होते. आणि या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा तसेच प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सुध्दा प्रभावित झाले होते. आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील जनतेला बराच मनस्ताप सहन करावा लागला. आणि शेवटी जिल्ह्यातील जनता वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात आणि जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले.
सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ बराच वायरल होत आहे त्यात जिल्ह्यातील जनतेला सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना, राजकीय पक्षांना आणि सामाजिक ज्ञान आणि ज़ाण असणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या समर्थनार्थ आणि स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला वेठीस धरणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आव्हाण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here