ग्रामपंचायत निवडणुकीचा गोंधळ
सर्व पक्षाचे दावे मात्र उमेदवार ‘हो…हो…’ च्या सुरात…
कोरपना प्रतिनिधी
कोरपना तालुक्यात २५ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून जमते न जमते सर्व पक्ष गावपाताळीच्या समीकरणाच्या आधारावर निवडणुकीची आखणी करून आराखडे तयार करत असले तरी राजकीय पक्षाचे दावे फोल असल्याचे चित्र निवडणूक निमित्याने दिसत आहे. आदिवासी भागातील व पेस क्षेत्रातील २५ ग्राम पंचायतीच्या निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी करत असताना गावपाताळीच्या राजकारणात कमालीचा तान सहन करत आहे. गावात मजूरदार सुगीचे दिवस म्हणत हवा निर्माण करत असले तरी राजकीय पुढाऱ्याना कसरत करण्याची पाळी आली आहे. राज्य व जिल्हा,तालुका स्तरावरील समीकरण मोडीत काडीत कुठे भा.ज.प +कॉंग्रेस पूर्ण तर कुठे राष्ट्रवादी कॉंग्रेस+संघटना युती तर कुटे गोंडवाना+भा.ज.प तर कुठे कॉंग्रेस +संघटना + गोंडवाना तर कुठे राष्ट्रवादी + गोंडवाना युती करून ग्राम पंचायत मैदानात उमेदवारांनी रंग भरत आहेत तालुक्यातील नांदा येथे संघटना+राष्ट्रवादी+गोंडवाना+भा.ज.प तर विरोधात कॉंग्रेस अशी युती झाली. कन्हाळगाव येथे भा.ज.प मध्येच दोन गट पडले आहे थुट्रा येथे राष्ट्रवादी+भा.ज.प+संघटनेत लढत होत असताना तर उपर्वाही येथे कॉंग्रेस च्या दोन गटात लढत होत आहे पिपर्डा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस+गोंडवाना युवतीचे १० उमेदवार उभे टाकले तर कॉंग्रस १ शेतकरी संघटना ४ व गोंडवाना २ भा.ज.प २ अपक्ष १ असे विरोध उमेदवार उभे आहेत.विशेषता तरुण उमेदवारांनी या निवडणुकीत उडी घेतल्याचे चित्र आहे वनसडी येथे कॉंग्रेस+राष्ट्रवादी युती तर भा.ज.प.+ संघटना युती आहे. सोनुर्ली येथे वंचित+बहुजन+कॉंग्रेस+भा.ज.प. असी लढत आहे पिंपळगाव खिर्डी येथे कॉंग्रेस,भा.ज.प,संघटना संमिश्र निवडणूक होत आहे गोंडवाना गणतंत्र पार्टी व जनसेवा गोंडवाना पार्टी यांणी गाव पातळीवर सोई नुसार युती केली आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाचा दावा सध्या फोल ठरण्याचे व दावे प्रतिदावे निवडणुकीच्या निकाला नंतरच चित्र स्पष्ठ होईल मात्र उमेदवार नेत्याचे चर्चेत हो.. हो… चा सूर भरत असल्याचे चित्र आहे.