जय भवानी कामगार संघटनेची नविन शाखा साखरी येथे स्थापन!कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यांसाठी दिले चौदा दिवस!सुरज ठाकरे यांच्या भीतीने कंपनीने ठेवला हाेता तगडा पाेलिस बंदोबस्त!
🟣🔷राजूरा
#किरण घाटे🟣
आज रविवार दि.४आँक्टाेबरला जय भवानी कामगार संघटनेची शाखा जी आर एन कंपनी साकरी (राजूरा तालुका) येथे स्थापन करण्यात आली.
सदरहु कामगार संघटनेच्या वतीने (स्थापनेच्या दिवशीच)कंपनी प्रशासनाला विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यांत आले व सदरहु मागण्या पूर्ण न झाल्यास दि.२०आँक्टाेबर रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे त्या निवेदनात नमूद करण्यांत आले आहे.
🔷🟣राजुरा विधानसभा क्षेत्र अंतर्गत असलेले सिमेंट कंपनी व कोळसा खाणी यामध्ये स्थानिक बेरोजगारांना जाणीवपूर्वक रोजगार उपलब्ध करुन देत नसल्या मुळे जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमांतुन बेरोजगारांना राेजगार उपलब्ध करून देण्याकरीता गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने लढा सुरू आहे परंतु लाँक डाऊन मुळे काही प्रमाणात शिथिलता आली होती आता परत नव्याने जय भवानी कामगार संघटनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता कंबर कसली असुन राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व सिमेंट कारखाने तथा कोळसा खाणींत आपल्या संघटना निर्माण करुन त्या ठिकाणी काम करीत असलेल्या स्थानिक बेरोजगारांची पिळवणूक होऊ नये या साठी जातीने (सदरहु संघटना) लक्ष पुरवित आहे कंपनीने ही पिळवणूक थांबवली नाही तर उपरोक्त संघटना निश्चितच( कामगार संघटना )आंदोलन उभे करणार असल्याची माहिती युवा नेते सूरज ठाकरे यांनी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान आज दिली या खेरीज स्थानिक बेरोजगारांना देखील तात्काळ कामावर सामावुन घेण्यात यावे व परप्रांतीयांचा भरणा कमी करावा अशी मागणी सुध्दा ठाकरे यांनी एका लेखी निवेदनातुन केली आहे
🟧🔷राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सिमेंट कारखाने व कोळसा खाणी असून देखील येथील तरुण हा आजही रोजगारापासून कोसोदूर आहे त्यामुळे तरुण पिढी ही गुन्हेगारीकडे वळत आहे परंतु राजकीय उदासीनतेमुळे या सर्व तरुण पिढीच्या हाताशी काम नाही हे प्रामुख्याने व प्रकर्षाने या भागात जाणवल्या जाते गेल्या १ वर्षांपासून सुरज ठाकरे हे बेरोजगारांचे व कामगारांचे प्रश्न घेऊन सतत प्रशासनाशी लढा देत असल्याने तरुण बेरोजगारांनात त्यांचे विषयी अधिक विश्वास वाढला आहे.हे मात्र तितकेच खरे आहे.