संत साहित्याचा चिंतनशील अभ्यासक गमावला
डॉ. रामचंद्र देखणे यांना सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 26 सप्टेंबर 2022 :
डॉ.रामचंद्र देखणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संत साहित्याचा आणि संत परंपरेचा एक चिंतनशील अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ.रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की भारूडातील तत्वज्ञान या विषयात डॉ.रामचंद्र देखणे तज्ञ होते. त्यांच्यामुळे भारूड हा वाङमय प्रकार महाराष्ट्राला नव्याने पुन्हा समजून घेता आला. महाराष्ट्राच्या संत साहित्य परंपरेचे ते आधुनिक काळातील पाईक होते. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या आणि वाचकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ना.श्री. मुनगंटीवार म्हणाले.