घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पं. दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी
“अंत्योदयापासून सर्वोदयापर्यंत” या मुलतत्वावरचं “सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास” चे तत्व आधारभूत आहे. – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
रविवार, दि. २५ सप्टेंबर
घुग्गुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात अंत्योदयाचे प्रणेते, महान तत्त्वचिंतक पं. दिनदयाळ उपाध्याय जी यांच्या १०६ व्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, पं. दीनदयाळजींना अंत्योदयाचे प्रणेते मानले जाते. त्यांनी जगासमोर एकात्म मानववादाचा सिद्धांत मांडला. समाजातील शेवटच्या घटकाच्या जिवनात आनंद निर्माण झाला पाहिजे आणि दुर्लक्षित घटक समाजाच्या प्रगत प्रवाहात आला पाहिजे यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य केले. पंडितजींचा अंत्योदयाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने नानाविध योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत.
“अंत्योदयापासून सर्वोदयापर्यंत” या मुलतत्वावरचं “सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास” चे तत्व आधारभूत आहे. सर्वार्थाने दरीद्रीनारायणाचे कल्याण व्हावे आणि देश उन्नतीच्या दिशेने मार्गस्थ व्हावा यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आवास योजना, उज्ज्वला गॅस, जन-धन खाते इ. अशा एकनाऐक योजनांच्या माध्यमातून अंत्योदयाच्या कल्याणासाठी मोदी सरकार प्रयत्नरत आहे. पुढे बोलताना, आज पंडितजींच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध सेवा कार्यक्रमांचे आणि मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, गो. वि. सिनेट सदस्य यश बांगडे, निरीक्षण तांड्रा, अमोल थेरे, बबलू सातपुते, नितीन काळे, भानेश शेट्टी, असगर खान, मधुकर धांडे, वसंता भोंगळे, सुशील डांगे, गणेश बोबडे, दिनेश बांगडे, महेश मुक्के, सुनील ब्रह्मे, श्रीकांत आगदारी, बबन मेश्राम, अविनाश कोराम, अमित चिंचोलकर, पराग धांडे, परमानंद निचकोला, मूर्ती पेरपुल्ला, दादू धांडे, आशिष दातारकर, राहुल बोबडे, विल्सन आंबट सोबत उपस्थित होते.