शिक्षक रुजू न झाल्यास शाळा बंद करण्याचा टोला नांदगाव शाळा व्यवस्थापन समितीचा इशारा
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत वेडगाव केंद्रातील टोला नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संतोष उईके यांची तात्पुरती प्रतिनियुक्ती हिवरा शाळेत करण्यात आली आहे.
यामुळे टोला नांदगाव येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक संतोष उईके यांची हिवरा येथील प्रतिनियुक्ती रद्द करून टोला नांदगाव येथील शाळेत परत देण्यात यावी.
23 सप्टेंबर रोज शुक्रवारला शिक्षक शाळेत रुजू न झाल्यास 24 सप्टेंबरला शाळा बंद करण्याचा इशारा टोला नांदगावच्या शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी गोंडपिपरीचे संवर्ग विकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांना पत्रकातून दिला आहे.