उत्तर प्रदेश ते चंद्रपूर भाजप मुस्लीम विरोधी : खासदार बाळू धानोरकर 

0
646

उत्तर प्रदेश ते चंद्रपूर भाजप मुस्लीम विरोधी : खासदार बाळू धानोरकर 

काँग्रेस अल्पसंख्याक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकार सबका साथ – सबका विकास- सबका विश्वास नारा देत असते. परंतु प्रत्यक्षात भाजप जातीयवादी पक्ष आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने मुस्लीम बांधवांना एकालाही उमेदवारी दिली नाही. त्याच धर्तीवर मागच्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत देखील एकही मुस्लीम बांधवाला उमेदवारी दिली नाही. हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे. देशात काँग्रेस पक्ष केवळ धर्मनिरपेक्ष असून सर्वाना न्याय देणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षातर्फे अल्पसंख्याक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग व वक्फ बोर्ड अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्जा, औवेस कादरीजी, प्रदेश महासचिव विजय नळे, शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी,  अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, रहेमनातुल्ला खान, सकीनाजी अन्सारी, प्रशांत भारती, माजी नगरसेविका सुनीता लोढीया, रमजान अली, सलुजा जी, हाजी हमीद यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणले कि, काँग्रेस ने 65 वर्षात तुम्हाला काय दिलं?? हा प्रश्न विचारून तुम्हाला काँग्रेस पक्षापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस ने अल्पसंख्याक समाजाला नेहमी न्याय दिला राष्ट्रपती पासून तर पंतप्रधान पर्यँत अनेक मानसन्मान दिले. जेव्हा विद्यमान केंद्र सरकारने एन आर सी, सी ए ए सारखे कायदे केले, त्यावेळी देखील काँग्रेस पक्षानेच अल्पसंख्याक बांधवांसाठी या कायद्याचा विरोध केला. अलीकडे हैदराबाद मधून कारभार हाकणारी पार्टी स्वतःला मुस्लिम समाजाचे हितचिंतक सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, पण भाजप ला हरवायचे असेल तर केवळ काँग्रेस ला साथ देणे आवश्यक आहे.  कारण ही वकिलाची पार्टी देखील भाजप ची ‘बी’ टीम आहे. असा घणाघाती हल्ला खासदार बाळू धानोरकर यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, वक्फ बोर्ड अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्जा यावेळी म्हणाले कि, मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने आधीपासूनच पुढाकार घेतला आहे. भाजपा मुस्लिमविरोधी धोरणे आखत असल्याने लोकशाही देशांमध्ये असूनही गळचेपी होताना दिसते. त्यामुळे मुस्लिम समाजाने काँगेस सोबत कायम राहावे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यासोबतच अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
काँग्रेस जिल्हा अल्पसंख्याक कार्यालयाचे उदघाटन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग व वक्फ बोर्ड अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्जा यांच्या हस्ते चंद्रपूर येथील आकाशवाणी रोडवरील अल्पसंख्याक विभागाच्या कार्यालयाचे उदघाटन पार पडले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, बसंत सिंग यांची उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
चंद्रपूर येथे होणार वक्फ बोर्डचे कार्यालय 
चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव आहेत. त्यांच्या सोई सुविधेकरिता वक्फ बोर्ड चे कार्यालय चंद्रपूर येथे करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, वक्फ बोर्ड अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्जा यांना केली होती. त्यांनी तात्काळ मान्य करीत लवकरच चंद्रपूर येथे वक्फ बोर्डचे कार्यालय होणार असल्याची घोषणा त्यांनी या मेळाव्यात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here