महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजी मुळे एक लाख रोजगार बुडाले…राष्ट्रवादी करणार राज्य स्तरीय आंदोलन
अहमदनगर
संगमनेर १४/९/२०२२
विशेष लेख…ज्ञानेश्वर गायकर
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
काल ही बातमी राज्यात धडकताच राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात युवकांनी पुढाकार घेऊन राज्य सरकारचा निषेध केला.
२०१४ साली राज्यात सत्तांतर झाले, तेव्हा पुणे जिल्ह्यातील चाकण तळेगाव परिसरात फोक्सकॉन ही कंपनी येणार होती, ती हरियाणा मध्ये स्थलांतरित झाली. फोक्सकॉन ने हा निर्णय का घेतला त्या बाबत मोठी चर्चा झाली होती, फडणविस सरकार चे ते मोठे अपयश होते. विरोधकांनी ही बाब गंभीर घेतली नव्हती, सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती ला राज्य मुकले होते.
वेदांत चा सिमिकॉण्डक्टर प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प होता, मोबाईल, ऑटो, दळणवळण, औद्योगिक साधने यांना लागणारे सेमी कंडक्टर सुटे भाग या कंपनी मध्ये बनवले जाणार होते. १ लाख ५८ हजार कोटी ची गुंतवणूक ही कंपनी करणार होती, व यातून तब्बल एक लाख रोजगार मिळणार होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या बाबत सतत प्रयत्न करीत होते. महा विकास आघाडी सरकारने या कंपनी बरोबर सर्व बोलणी करून उपलब्ध सोयी करून दिल्या होत्या. राज्य सरकार ला सुमारे २२ हजार कोटी चा महसूल ही या मधून मिळणार होता.राज्याचे तत्कालीन उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी शक्ती वापरून ,या कंपनीला वातावरण पोषक बनवले होते. मात्र राज्यात शिंदे यांचे सरकार स्थापन झाले, या प्रकलपा बाबत अनिच्छिता तयार झाली. कंपनी व एमआयडीसी अधिकारी यांच्या बोलनित राज्य सरकार सहभाग झालाच नाही, सत्ता संघर्ष इतका तीव्र होता की राज्यकर्ते राज्याला विसरून गेले. दरम्यान राज्यात इतक्या मोठ्या घडामोडी घडत असताना , गुजराथ सरकार हा प्रकल्प गुजराथ मध्ये कसा पळवता येईल ,याची संधी पाहून होते. अन् त्याचे झाले ही तसेच , या कंपनी चे अधिकारी अगरवाल यांना मुख्यमंत्री यांनी भेटच दिली नाही. गणपती बाप्पा दारोदारी भेट देणारे शिंदे यांनी अगरवाल यांना भेट न दिल्याने , गुजराथ चे दुय्यम प्रपोजल त्यांनी तयार केले, अन् अखेर प्रकल्प गुजराथ राज्यात गेला. फडणवीस यांनी ही बाबत लक्ष दिले नाही.राज्याला उद्योग मंत्री नाहीत, ते आता कुठ आहेत, त्यांनी तर या बाबत मला काहीच माहिती नाही असेच व्यक्तव्य केले आहे. हा प्रकल्प एमआयडीसी अधिकारी यांनी खूप दिवस लावून धरला ,पण केवळ शिंदे फडणवीस यांच्या हलगर्जी पणा मुळे हा प्रकल्प गुजराथ मध्ये गेल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राज्यातील विरोधी पक्ष नेता अजित दादा पवार यांनी ही या वर भाष्य केले आहे. त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करा असा सल्ला राज्य सरकार ला दिला आहे.
महा विकास आघाडी सरकार असते तर नक्कीच हा प्रकल्प राज्यात राहिला असता, असा ठाम विश्वास सामाजिक माध्यमातून अनेक तरुणांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ही शिंदे फडणवीस सरकार वर मोठा निशाणा साधला असून हे शिंदे सरकार चे व त्यांच्या मंत्र्यांचे मंत्रालयात न बसण्याचे परिणाम आहेत असे म्हटले आहे.आम्ही असतो तर हा प्रकल्प राज्यातच राहिला असता असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठ आंदोलन करणार असून, याचा निषेध म्हणून राज्यातील प्रत्येक युवक शिंदे फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी मंत्रालयात लेखी पत्र पाठवणार आहे, राज्याचे अध्यक्ष श्री शेख ,आशिष मेटे यांनी काल ट्विटर वर स्पेस मध्ये चर्चा करताना सांगितले आहे. या बाबत एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी , युवा सेना मोठे आंदोलन राज्यात करील, असा विश्वास अनेक युवकांना असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान सरकार पक्षाकडून कोणती ही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. उद्योग मंत्री यांना या बाबत काहीच माहिती नाही, माहिती घेऊन बोलू असे पत्रकारांना रात्री उशिरा सांगितले.
समाज माध्यमातून मोठ्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आगामी निवडणुकीत शिंदे फडणवीस याना मोठा धोका निर्माण होणार आहे, आगामी गुजराथ प्रांत मध्ये विधानसभा निवडणुका आहेत . आप ने गुजराथ पिंजून काढला आहे. भाजप पुन्हा सत्तेत येणे गुजराथ मध्ये अवघड आहे, या क्षणाला गुजराथ मध्ये आप ७७ जागा मिळविल असा मोठा सर्व्हे आला आहे.अद्याप तीन महिने बाकी आहेत, हरियाने मद्ये ही आप पुढे आहे. आप वर सध्या केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर होत आहे. राज्यात जसा राष्ट्रवादी शिवसेना या पक्षावर झाला , तसा आता आप वर होताना दिसत आहे. मतदार दोन्ही ठिकाणी केजरीवाल यांच्यावर खुष आहे. केजरीवाल हे पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत. युवक , महिला , शेतकरी, कर्मचारी त्यांना साथ देत आहे. पंजाब मध्ये जे घडले ते या दोन्ही राज्यात होणार आहे, वेदांत प्रकल्प पळवण्याचा भाग हा त्यातीलच आहे.या प्रकल्पाला भुलून गुजराथी युवक शांत बसेल, व पुन्हा भाजप चे प्राबल्य राखेल असा मोदी शहा यांना विश्वास आहे. महाराष्ट्र सरकार शिंदे फडणवीस यांचे नसून अमित शहा हे रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून चालवतात असा सर्वच विरोधी पक्षांचा आरोप आहे. हा प्रकल्प गुजराथ मध्ये जाण्यास शिंदे फडणवीस जबाबदार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. विरोधक चौकशीची मागणी करत आहेत. २०१४ साली जे घडत होते तेच आज घडत आहे. अखेर राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजराथ मध्ये जात असेल तर येथील राज्य कर्त्यांचे करायचे काय? असा सवाल युवक विचारात आहे. मुंबई महा नगर पालिका मध्ये मराठी शक्ती एकटवली जाईल, राज ठाकरे यांनी ही या बाबत मोठी टीका केली आहे. त्यांनी ही चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस ने मागणी केली आहे. महाराष्ट्र आप ने मागणी केली आहे. शिंदे फडणवीस सरकार या बाबत शब्द ही काढत नाही, या बद्दल आणखी संशय निर्माण होत आहे. एक मात्र खरे, या प्रकल्प स्थलांतरित करण्यात आला असल्याने राज्यात नक्कीच रान पेटविले जाईल , विरोधक आक्रमक होईल असे तरी सध्या चित्र आहे.
“स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके” महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झालं असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असं हे सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांतचा संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून चाचपणी करत होतो. अनेक बैठका घेत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे जवळपास ९५ टक्के निश्चित झालं होतं. स्वाक्षरी झाल्यानंतर १०० टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
आदित्य ठाकरेंनी पुढे सांगितलं की, सुभाष देसाई आणि मी वेदांत कंपनीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. २१ जानेवारी २०२२ रोजी आमची वेदांत आणि फॉक्सकॉनच्या उद्योगाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जागा निश्चितीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी पाहणी करण्यात आली. शेवटी पुण्याजवळील तळेगाव येथील जागा निश्चित केली. हा उद्योग गुजरातमध्ये जाण्याबाबत किंवा कुठेही इतरत्र जाण्याबाबत दु:ख नाही. पण ही कंपनी महाराष्ट्रात येणार हे ९५ टक्के ठरलं असताना, शेवटच्या क्षणी ही गुंतवणूक दुसरीकडे का गेली? हा प्रश्न आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते. सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असं हे सरकार आहे. ‘बाजीगर’ चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘हार के जीतने वाले को बाजीकर कहते है’, पण या गुंतवणुकीच्या बाबतीत, जीत के हारनेवाले को खोके सरकार कहते है, असं लागू होतं” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.