भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने एक नवीन संदेश
बौद्धांनी व्यर्थ खर्च करू नये… तो खर्च समाजकार्यात लावा….
समाजात व्यर्थ करण्याची सवय आजही आहे,जसे तेरवी, बर्थ डे,लग्न,व इतर मिरवणुक या वर मोठा पैसा खर्च केला जातो आता तो खर्च बौध्द समाजाने न करता समाजकार्यात खर्च करावे असे मत भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत पाझारे यांनी व्यक्त केले.
दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी पंचशील चौक नगर परिषद घुग्घुस च्या मागे गावंडे बिल्डींग जवळ असलेले स्मृतीशेष बैयनाबाई नगराळे यांचे वृद्धापनामुळे रात्रो १०:३० वाजता दुख:त निधन झाले. याच्या अंतवीधी बौद्ध स्मशान भुमी घुग्घुस येथे करण्यात आला. परिवारातील सदस्य अरुण कांबळे यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत पाझारे यांना तिसऱ्या दिवशीय कार्यक्रम आम्ही उद्या दिनांक १२ सप्टेंबर २०२२ ला करण्याचे ठरविले आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.
सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत पाझारे यांनी एक समाजात नवीन चळवळ सुरू करुन काहीतरी नवीन बदलाव आपण समाजामध्ये घडविण्याचा निच्छय केला असून आपल्या समाजामध्ये पैसा असुन समाजातील लोक व्यर्थ पैसा उडवितात ज्यामुळे समाजातील कार्यक्रम सुध्दा मोठ्या प्रमाणात घेणे सुध्दा कठीण होत चालले आहे.
तर सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी हेमंतभाऊ पाझारे यांनी सांगितले की वाढदिवस, गृहप्रवेश, तिसरा दिवस असा कार्यक्रमात पैसा व्यर्थ करण्यापेक्षा जर समाजातील लोकांनी हा पैसा समाजामध्ये दान दिला तर समाजाकडे पैसा गोळा होऊन समाजातील कोणतेही कार्यक्रम किंवा यातुन आपण समाज घडवु शकतो
असा ठाम विचार आपण समाजातील लोकांपर्यंत पोहोचेल यामाध्यमातून अरुण कांबळे यांनी जो तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम घेण्याचे चे ठरविले होते त्यांना हि बाब सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व हेमंतभाऊ पाझारे यांनी समजवून सांगितले व अरुण कांबळे यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना सांगितले तर सर्व परिवारातील सदस्य या उपक्रम समजून आंनदीत झाले व खरच आपल्या समाजाकडे इथुन पैसा गोळा होईल म्हणून स्मृतीशेष बैयनाबाई नगराळे यांच्या परिवारातील सदस्य अरुण कांबळे, धनराज धुप्पे, यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव,बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे यांना आमंत्रित करुन सर्व परिवारातील सदस्याचा समक्ष पाच हजार रुपये दान देण्यात आले.
भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सर्व बौद्ध बांधवांना या उपक्रमाचा माध्यमातून संदेश दिला कि जर आपण वाढदिवस, गृहप्रवेश, तिसरा दिवस, व अन्य कोणतेही कार्यक्रम करण्या ऐवजी हा पैसा जर समाजाकडे दान दिला तर यामधुन समाजाला घडविण्याचे काम आणि एक आंबेडकरी चळवळ मोठी करु शकतो कारण आपला कार्यकर्ता हा पैसा मुळे माघ पडतो म्हणून आपण समोर जात नाही. म्हणून सर्व जेथुन होते त्यातून दान द्यावे. असा संदेश सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस यांनी दिला यावेळेस विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंतभाऊ आनंदराव पाझारे चंद्रगुप्त घागरगुंडे योगेश नगराळे, अरुण कांबळे, धनराज धुप्पे, आदी उपस्थित होते.