रासेयो च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी बांधवाच्या दारा प्रर्यंत पोहचवण्याचा संकल्प

0
661

रासेयो च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी बांधवाच्या दारा प्रर्यंत पोहचवण्याचा संकल्प

मा. डाॅ. श्याम खंडारे संचालक रासेयो विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

 

 

अहेरी : एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, आणि रासेयो विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे संयुक्त विद्यमाने राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली यांनी महाविद्यालयाचे प्रांगणात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, आयोजित माडीया सांस्कृतिक महोत्सव चे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले. जागतिकीकरणामुळे आणि समजमाध्यमाच्या प्रभावामुळे, माडीया आदिम जमातीच्या लोप पावत असलेल्या सांस्कृतीक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवार ला महाविद्यालयाचे परिसरात माडीया सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी उदघाटक मा.लोखंडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.यू.टिपले,विशेष अतिथी मा.डॉ. ए.चंद्रमौली अधिष्ठता, मानव विज्ञानविद्याशाखा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ,प्रमुख पाहुणे मा.डॉ.श्याम खंडारे, संचालक रासेयो विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ,डॉ. कन्ना मडावी अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अहेरी तसेच विविध स्पर्धांचे परिक्षक म्हणून मा. वासनिक साहेब गृहपाल मा. खेडीकर साहेब गृहपाल मा. गांवडे मॅडम गृहपाल शासकीय आदिवासी वस्तिगृह, आलापल्ली/अहेरी तर मा.प्रकाश घोडमारे सेवानिवृत्त प्राध्यापक होते तसेच निमंत्रित म्हणून प्राचार्य मंडल सर, प्राचार्य डॉ.मेश्राम सर, प्राचार्य डॉ. खोंडे सर, प्रा.बनसोड मॅडम , रासेयो विभागीय समन्वयक , रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.घोडेस्वार व प्रा.मोरे तसेच भामरागड, एटापल्ली,अहेरी तालुक्यातील माडिया बांधव ,स्पर्धक,गावातील प्रतिष्ठित नागरिक, रासेयो स्वयंसेवक , परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.या महोत्सवाच्या निमित्ताने मान्यवर पाहून्याचा व बक्षिस पात्रता धारकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वेशभूषा, तिरकामठा, व हस्तकला स्पर्धा घेण्यात आल्या. तिरकामठा स्पर्धेत ६ स्पर्धकांनी भाग घेतला त्यात मा.विक्रम करपेत यांनी प्रथम क्रमांक तर मा.विजय गाऊत्रे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. वेशभूषा स्पर्धेत ९ स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यात मा.अनूप मांजी यांनी प्रथम क्रमांक तर मा. पोर्णिमा इष्टाम यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला हस्तकला स्पर्धेत १० स्पर्धकांनी प्रवेश नोंदविला त्यात मा. नरेंद्र मडावी यांनी प्रथम क्रमांक तर मा. भगवान मडावी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.तसेच मा.विजय दूर्गे सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्तकला चित्रांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी परंपरागत सामूहिक माडीया नृत्य सादर करण्यात आले. उदघाटनिय सोहळ्याचे संचालन प्रा. कू. अनिता घसगंटीवार,आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रकाश सोनुले यांनी मानले.समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.प्राचार्य डॉ.मारोती टिपले ,विशेष अतिथी मा.राहुल सिंह टोलिया (भावसे) उपवनसंरक्षक आलापल्ली वनविभाग, मा.डॉ.नीरज खोब्रागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कू.सोनाली गंपावार,बक्षीस वितरण कायक्रमाचे संचालन डॉ.राजेश सूर,आभार प्रा. कू.प्रतिमा सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रा नंतर उपस्थित सर्वांनीच भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा.अंकीत साहेब ए.आ.विकास प्रकल्प अहेरी, मा. डॉ. प्रशांत बोकारे कूलगूरू साहेब गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व कर्मचारी तसेच रासेयो स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने धास्तावलेल्या तरूणांनी कार्यक्रमा नंतर सामुहिक आदिवासी रेला नृत्याचा मनपूर्वक आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here