राजकारणाशी गैरसंबंधित असलेला राहुल चौधरीचा भाजपा प्रवेश म्हणजे काँग्रेसला खिंडार नसून भाजपाची फाजील समाधानी

0
750

राजकारणाशी गैरसंबंधित असलेला राहुल चौधरीचा भाजपा प्रवेश म्हणजे काँग्रेसला खिंडार नसून भाजपाची फाजील समाधानी

काँग्रेस तालुकाध्यक्ष तुकाराम झाडेंचा खुलासा

 

 

गोंडपिपरी – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा नुकताच चंद्रपूर जिल्हा दौरा झाला. दौऱ्या दरम्यान भाजपाच्या बढ्या नेत्यांच्या उपस्थितीत ज्यांनी कधी राजकारणात सहभाग सुद्धा नाही घेतला.ना कधी काँग्रेसचे काम केले ना कधी भाजपाचे काम केले. मुळात यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. आणि राजकीय माध्यमात त्यांना कुठलाही रस नाही. असे गोडपिंपरीचे प्रतिष्ठित व्यापारी राहुल चौधरी याना गोंडपिपरी मधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मा. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या दौरा कार्यक्रमात हजर करवुन राहुल चौधरींचा भाजपात प्रवेश करवून घेतला.आणि काँग्रेसला खिंडार अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुका भाजपा फाजील समाधानी करून घेत आहेत.

राहुल चौधरी हा गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजार समितीचे सभापती मा. सुरेशराव चौधरी यांचे चिरंजीव आहेत. परंतु राहुल चौधरी यांचे माध्यम व्यापार व दुकानदारी असून राहुल चौधरी हे राजकीय दृष्टिकोनातून सपशेल विरोधात्मक असून स्वतः राहुल चौधरी यांनी कधीही काँग्रेस पक्ष वाढीसाठी, तालुका काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य केलेलेच नाही. आणि त्यांना यापूर्वी स्वतःचे वडील राजकारणात आहे म्हणून कधी राजकीय मुद्द्यावर त्यांनी राजकारणाचा रस घेतलेला नाही. राहुल चौधरी यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे गोंडपिंपरी तालुका काँग्रेसला कुठलाही फरक पडलेला नसून, तालुक्यातील भाजपा कमेटी राहुल चौधरी च्या भाजपा पक्षप्रवेशाला काँग्रेसला खिंडार म्हणवून घेत आहे ही नुसती भाजपाची फाजील समाधानी आहे.सोबतच श्री. सुरेशराव चौधरी यांची कारकीर्द आणि सहकार्य सतत काँग्रेसला राहिलेल असून त्यांचे कार्य आमदार सुभाषभाऊ धोटे यांचेसाठी तालुक्यात खंबीर नेतृत्वाच राहिलेलं आहे. मा. सुरेशराव चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस पक्ष वाढीसाठी ते सतत झटत असतात. त्यांच्यासोबत तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा काँग्रेस पक्ष वाढीसाठी आणि काँग्रेसची उत्तम कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत सहकार्य करत असतात. राहुल चौधरी याच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसला तीळ मात्र सुद्धा फरक पडलेला नाही. राहुल चौधरी याना राजकीय माध्यमात कुठलीही आवड नसल्याने त्यांनी कधीच काँग्रेस पक्षातच काय तर राजकीय माध्यमातच त्यांनी काम केलेल नाही. त्यामुळे राहुल चौधरी च्या भाजप पक्षप्रवेशाची काँग्रेसला खिंडार नसून तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची नुसती थोतांड समाधानी आहे.असे मत काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे यांनी प्रसिद्धपत्रकातून व सोशल मीडियातून खुलासा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here