विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी मुख्यमंत्री आमदार जोरगेवार यांना रात्री 2 वाजता भेटतात तेव्हा…..
मुख्यमंत्री म्हटले तर, दिवसभराचा व्यस्त कार्यक्रम आलाच.. त्यातही दुस-या दिवशी पुन्ह: सकाळपासून थकवणारा व्यस्त दौरा. अशातही राज्याचे मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत काम करतात अशा आजवर चर्चा होत होत्या. मात्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मतदार संघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयाकरिता त्यांनी चक्क रात्रो 2 वाजता आ. जोरगेवार यांना वेळ दिली. त्यामुळे या चर्चेतील सत्यताही आता समोर आली आहे.
झाले असे कि, चंद्रपूर मतदार संघातील अपक्ष आमदार विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी मुंबईला गेले आहे. यातील अनेक कामे मुख्यंमत्री यांच्या विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ मागीतला. मुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे म्हणजे कठीणच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवसभर व्यस्त कार्यक्रम असल्याने आ. जोरगेवार यांना त्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे आता भेट होणार नाही असा अंदाज त्यांना आलाच. तरी एकदा त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयांकरिता भेटायचे असल्याचे मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहायकाच्या लक्षात आणून दिले. पण आता रात्रीचे 11 वाजले होते.
दिवसभर धावपडीत असलेले मुख्यमंत्री आता आराम करत असतील असा आ. जोरगेवार यांचा समज झाला. मात्र झाले उलटे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत आ. जोरगेवार यांचा विषय पोहचताच रात्रो दोन वाजताच्या सुमारास त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना मुंबई येथील वर्षा बंगल्यावर बोलावले. तेथे आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी जवळपास 15 मिनिटं मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा झाली. मध्यरात्रीची वेळ असतांनाही त्यांच्या चेह-यावर थकवा नव्हता ते उत्साही दिसत होते. असे जोरगेवार यांनी म्हटले आहे. मी सांगीतलेले अनेक विषय प्राथमिकतेने सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले. या प्रकरानानंतर संवेदनशील, 24 तास उपलब्ध असणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला असेच म्हणावे लागेल.