अंगणवाडीला भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा
राजुरा : छावा फाउंडेशन राजुरा चे अध्यक्ष आशिष करमरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पंचशील वार्ड राजुरा येथील अंगणवाडीला भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी छावा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष करमरकर, सचिव आकाश वाटेकर, उपाध्यक्ष बबलू चव्हाण, सहसचिव रणजीत उगे, रखिब शेख, देवकिशन वनकर, गौरव रागीट, स्वप्निल मायकलवार व इतर मान्यवर उपस्थित होते.