मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश नको

0
547

मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश नको

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सावली तर्फ़्रे मुख्यमंत्रयाना दिले निवेदन

 

सध्या सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे असे म्हणत आहे.माञ हे चुकीचे आहे.अजुनपर्यत ओबीसीचे १९% आरक्षण महाराष्ट्रतील अनेक जिल्हात मिळालेले नाहीत.त्यात चंद्रपुर ११% यवतमाळ १४%,धुळे,नंदुरबार,नाशिक,रायगड,पालघर ९%आणि गडचिरोली ६%अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात विसंगती दिसुन येते ही विसंगती त्वरित दुर करण्यात यावी तसेच मराठा आरक्षणाला महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचा विरोध नाही माञ मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समावेश करु नये अशी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महसभा तालुका सावलीची मागणी आहे.तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी असे निवेदन मुख्यमंत्री याणा तहसीलदार सावली यांच्या मार्फ़त पाठविन्यात आले
यावेळी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा चंद्रपुर विभागीय सचीब तूळशिदास भुरसे, चंद्रपुर जिल्ह्य सचिव भाऊराव कोठारे त सावली तालुका अध्यक्ष इश्वर गंडाटे,, तालुका संघटक जितेश सोनटक्के, सुधीर लाकडे व महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा, युवा आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्तित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here