गाव तिथे फळझाडे एक अभिनव उपक्रम ! राजूरा ☀️🟣अमाेल राऊत🌼 सृजन नागरिक मंच राजुराच्या वतीने गाव तिथे फळझाडे हा एक उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रम अंतर्गत राजुरा तालुक्यातील बोरगाव ( बोटरा)येथे दि .25 सप्टेंबर 2020 ला गावात फणस, चिकू , शेवगा , बदाम या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी शाळेतील मुले, परी लोहे, जीवन देशकर, संध्या माणुसमारे, श्रेयस बोडे, श्रावणी मोरघे, प्रेम मोहूर्ले या शाळेकरी मुलांनी अगदि (वर्ग शिक्षक यांच्यासह )आनंदाने स्विकारली सदरहु उपक्रमा साठी मंचाचे संयोजक मिलिंद गड्डमवार, राजू साईनवार, सामाजिक कार्यकर्ता मेघा धोटे, त्याच प्रमाणे गावातील सारिका माणुसमारे, मारोती देवतळे, बापूजी येमुलवार यांनी वृक्षारोपणात सहभाग नाेंदविला
शाळेकरी मुलांत झाडांबद्दल आवड निर्माण व्हावी, झाड जगले पाहिजे म्हणून या साठी कशी काळजी घ्यावी ह्याची माहिती या वेळी शाळेकरी मुलांना देण्यात आली.
सृजन नागरिक मंच , प्रत्येक आठवड्याला एका गावात वृक्षारोपण करून त्या झाडांची जबाबदारी शाळेकरी मुलांना देते, व त्याचा अहवाल भेट घेऊन ठेवत असते , त्यामुळे झाडे जगण्याचे प्रमाण अधिक आहे. सृजन नागरिक मंचच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन अनेकांनी या शाळेकरी मुलांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे .