महापुराने वेढलेला गावाला वंचित बहुजन आघाडीचा आधार
दिनांक २ आगस्ट २०२२ रोज मंगळवारला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सर्वांचे लाडके नेते, गोरगरिबांचे उद्धारकर्ते, तरुणांचे प्रेरणास्थान श्री. भूषणजी फुसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चेकबापूर, सकमूर आणि हेटी नांदगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला सदर कार्यक्रम मा. फुसे साहेब यांच्या सहकार्यात पार पडला.
कार्यक्रमात आरोग्य तपासणी साठी डॉ. प्रदीप मंडल (MBBS, MD) मेडिसिन त्यांचे सहकारी डॉ. तझिन मॅडम (MBBS) डॉ. एम. बी. विश्वास, असिस्टंट मॅडम डॉ. शीतल हे सर्व उपस्थित राहून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करून मोफत औषधोपचार व आरोग्य सल्ला दिला. या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे वंचित बहुजन आघाडी, सकमुर तर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
सकमूर, चेकबापूर व हेटी नांदगाव हा गाव गेल्या १४ दिवसापासून महापुराने वेढलेला होता. त्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नव्हता, शिवाय महापुरामुळे गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही सदर गोष्ट लक्षात घेऊन मा. जिल्हाध्यक्ष फूसे साहेबांनी हा मोफत आरोग्य तपासणीचा कार्यक्रम राबविला होता. या कार्यक्रमाला २४८ रुग्णांनी उपस्थित राहून या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मा. डॉ. प्रकाश तोहोगावकर, उपाध्यक्ष लक्ष्मण रामटेके, महासचिव सुरेंद्र रायपुरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख भारत चंद्रागडे, युवा नेते नितेश जुनघरे, जिल्हा उपाध्यक्ष तेजराव डोंगरे, शाखाप्रमुख दिलीप मुंजनकर, धाबा सर्कल सचिव सुरज मुत्येमवार, भारतीय बौद्ध महासभा शाखा चेकबापूरचे अध्यक्ष राहुल मुंजनकर, सुमेध मुंजनकर, बबन रामटेके, भारत गोंगले व सर्व वंचित बहुजन आघाडीचे सक्षम कार्यकर्ते उपस्थित होते.