आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण कार्यक्रम राबवून साजरा
चुनाळा ग्रा.पं.चा “अभिनव उपक्रम”
जगवलेल्या करोडो रुपयेच्या झाडासोबत केक कापुन केला वाढदिवस साजरा
माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे यांची उपस्थिती
राजुरा : आज जिल्ह्याचेच नव्हे तर लोकनेते, विकास पुरुष, अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याचे माजी अर्थ, नियोजन तथा वन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात विविध समजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला गेला जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायत चे लोकाभिमूख सरपंच बाळू भाऊ वडस्कर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. चुनाळा ग्रा.पं.चे वैशीष्ठ म्हणजे ग्रा.पं.च्या मालकीच्या सात एकर जमिनिवर सन 1989 पासुन हजारो साग व इतर मौल्यवान झाडांची लागवड करुन काटेकोरपणे जोपासना केल्यामुळे अस्तित्वात असलेल्या झाडांची अंदाजीत कींमत दोन कोटी रु.पर्यंत झाली आहे. या ग्रा.पं.नी खरया अर्थाने सुधीरभाऊ च्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पुर्तता करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याप्रसंगी गेल्या अनेक वर्षा पासुन लावलेल्या झाडांना जगवुन भाऊच्या वाढदिवसा सोबत जगवलेल्या झाडांचा सुद्धा वाढदिवस चुनाळा चे माजी सरपंच संजय पावडे यांचा सुद्धा योगायोगाने आजच वाढ दिवस असल्यामूळे त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी भाजप चे तालुका अध्यक्ष तथा जि.प.चे माजी सभापती सुनिल उरकूडे, अरुण मस्की, सतिश धोटे, राजेंद्र डोहे, विनायक देशमुख, हरिदास झाडे, प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, सचिन डोहे, सचिन शेंडे, जनार्धन निकोडे, पराग दतारकर, प्रा.शंकर पेद्दुरवार, ग्रा.पं.चे सदस्य राकेश कार्लेकर, रविंद्र गायकवाड, उषा करमनकर, दिलीप मामा मैसने, रमेश निमकर, प्रफुल चौधरी, प्रविण साळवे, शंकर धूमने, घनशाम कार्लेकर सह प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थीत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रा.पं.चे कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.