मी मनापासून आभारी आहे…

0
880

मी मनापासून आभारी आहे…

जयेंद्र दादा खुणे (प्रदेशाध्यक्ष, मुंबई, आगरी सेना)

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारी महोदयांनी मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यास मुंबई आर्थिक राजधानी उरणार नाही अशी स्तुतीसुमने मुंबईच्या राजधानीबद्दल केली. खरोखरच त्यांनी हे केलेले व्यक्तव्य योग्यच आहे. त्यांनी खरोखरच गुजराती आणि राजस्थानी उद्योगपतींना मुंबईतून हद्दपार करावेच. कारण त्यांचाच मुळे तर आज मुंबईतील भूमिपुत्र हा नैसर्गिक साधन संपत्तीवर जगणारा आगरी कोळी देशोधडीला लागला आहे. उद्योगपतींच्या खिसे भरू विकासाच्या नावाने मुंबईतील भूमिपुत्र बरबाद झालेला आहे. यापुढे भूमिपुत्रांची होणारी बरबादी टाळण्यासाठी महामहीम राज्यपाल महोदयांनी सांगितलेला उपाय हा योग्य असाच आहे. मुंबईतील मुळ भूमिपुत्र असलेले आगरी कोळी यांनी आर्थिक राजधानी नको तर आम्हाला नैसर्गिक साधनं संपन्नता हवी आहे. मुंबईतील राजकारणी आणि स्वार्थी उद्योगपतींनी मुंबईची लुटमार करून आर्थिक बळ निर्माण केले आहे. या कारणास्तव मुळ भूमिपुत्राचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अस्तित्व नामशेष केले आहे. भूमिपुत्रांच्या जमिनीवर विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन संपत्ती हिरावून घेतली आहे. अशा आर्थिक राजधानीची आम्हाला गरज नाही. म्हणून राज्यपाल महोदयांनी तसे निर्देश शासनाला देवून मुंबईतील सर्व उद्योगपती आणि मंत्रालय देखील मुंबई बाहेर हलवावे.जेणे करून कला, संस्कृती, परंपरा अशा विविधतेने नटलेली, नैसर्गिक साधन संपतीयुक्त मुंबई हि मुळ भूमिपुत्रांसाठी जिवंत ठेवावी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here