अतिवृष्टीमुळे घर पडून जखमी झालेल्या कुटुंबाची काँग्रेस चे शहर अध्यक्ष रामुभैय्या तिवारी यांनी घेतली भेट
चंद्रपूर : जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बाबूपेठ येथील राकेश बारसागडे यांचे घर अचानक कोसळले. त्यामध्ये पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले.
ही माहिती मिळताच काँग्रेसच्या उपाध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी झालेल्या रुग्णाची भेट घेऊन याबाबतची काँग्रेस शहर अध्यक्ष रामुभैय्या तिवारी यांना माहिती दिली. रामु भाऊंनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चंद्रपूर चे तहसीलदार गोन्ड सर यांना सोबत घेऊन सामान्य रुग्णालयात जखमी झालेल्या रुग्णाची भेट घेण्यास गेले.
त्यांनतर बाबूपेठ येथे मौका स्थळी भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण घर पडल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले ही बाब लक्षात येताच काँग्रेस अध्यक्ष रामुभैय्या यांनी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देऊ असे या प्रसंगी सांगितले. या प्रसंगी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा संगीता अमृतकर, गोपाल अमृतकर, पप्पू सिद्धीकी, चंदा वैरागडे यांचे सह वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.