अपयश लपविण्यासाठी भाजपची कारवाई : आमदार प्रतिभाताई धानोरकर
वरोरा येथे खासदार बाळु धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात सत्याग्रह
चंद्रपूर : महागाई, बेरोजगारी देशात वाढत आहे, देशातील स्वायत्त संस्था नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने विकायला काढलेल्या आहेत. भाजपने सर्वसामान्य जनतेवर अन्याय कारक जीएसटी लादला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या याच दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहेत. हे आपले पाप, आपले अपयश लपविण्यासाठी फक्त राजकीय द्वेषातून केंद्रातील भाजप सरकार सोनिया गांधींवर ईडीमार्फत कारवाई करत आहे, असा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला आहे.
खासदार बाळु धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रोषनी मकवाने यांना निवेदन सादर केले. केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, माजी गटनेते गजानन मेश्राम,माजी पं.स. सभापती रवींद्र धोपटे, राजू महाजन, मनोहर स्वामी, प्रदीप बुराण, निलेश भालेराव, छोटु शेख,अनिल झोटींग,शुभम चिमुरकर, सुरज गावंडे, सुनंदा जीवतोडे, दिपाली माटे, रत्ना अहिरकर, मंगला पिंपळकर,शिरोमणी स्वामी, ऐश्वर्या खामनकर,मिना रहाटे,चेतना शेट्टे,सुभाष दांदले,सलीम पटेल, सनी गुप्ता,पंकज नाशिककर,प्रमोद काळे,राहील पटेल,प्रफुल्ल आसुटकर, राहुल देवळे, हरिभाऊ भाजीपाले, निसार पठाण, मनोज पेंदोर, सुजीत कष्टी, सन्नी गुप्ता, कातकर आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून लक्ष करीत असल्याचा आरोप करुन वरोरा काँग्रेसने आज सत्याग्रह आंदोलन केले .
भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. ‘ईडी से हम नहीं डरेंगे…देश की खातिर लड़ते रहेंगे’ ‘हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.