रस्त्यासाठी गावकऱ्यांचा कंपनी विरोधात एल्गार अल्ट्राटेक कंपनी समोर छेडले धरणे आंदोलन
शाळकरी विदयाथीॅ सुदधा आदोंलनात सहभागी
नांदाफाटा प्रतिनिधी
मौजा पालगाव ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनीपर्यंतचा रस्त्याचे बांधकाम करावे या मागणीसाठी आता गावकऱ्यांचा संयम सुटलेला अजुन आज थेट कंपनी प्रशासनाचे भावना समोर गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केले गेल्या 30 वर्षापासून पालगाव ते कंपनी पर्यंतचा रस्ता कच्चा असून सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी गावकरी करीत आहे रस्त्या लागतच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान असून रस्ता कच्चा स्वरूपात असलेला दिसून येतो त्यामुळे गावकऱ्यांना आता पावसाळ्यात खड्डे आणि चिखलाचा सामना करून ये जा करावी लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी असुन याकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही गावकरी करताना दिसत आहे वारंवार कंपनी प्रशासनाला सांगून याची दाखल न घेतल्यामुळे शेवटी आता गावकऱ्यांनी महिला लहान विद्यार्थ्यांसह कंपनी प्रशासनाच्या प्रशासकीय इमारती समोरच धरने आंदोलन सुरू केले साधारणतः दोन ते तीन किमी अंतर असलेला हा रस्ता नांदा फाटा औद्योगिक वसाहतीला जोडणारा असून याच रस्त्याने गावकऱ्यांना बँक पोस्ट ऑफिस शाळा महाविद्यालय तथा गडचांदूर शहराकडे जावे लागते रात्रपाळीत रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे ठरले असून मोठे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहे सोबतच रस्त्याच्या बाजूला असलेल्या खदानीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शेतकरी कामगार तथा विद्यार्त्याचे मोठे हाल होत आहे सदर गाव कंपनी अंतर्गत दत्तक गाव येत असून या गावापर्यंत सिमेंट रस्ता करावा अशी मागणी याप्रसंगी गावकऱ्यांनी केली आहे आता कंपनी प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.