आदिवासी समाजाच्या महिला आज देशाच्या राष्ट्रपती झाल्यात हिच या लोकशाहीची सुंदरता – आ. किशोर जोरगेवार

0
703

आदिवासी समाजाच्या महिला आज देशाच्या राष्ट्रपती झाल्यात हिच या लोकशाहीची सुंदरता – आ. किशोर जोरगेवार

 

 

द्रौपदी मुर्मू यांची आज देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदासाठी निवडुणक प्रक्रियेतुन निवड करण्यात आली. ऐकेकाळी गोंड राजाचे राज्य असलेल्या चंद्रपूर जिल्हासाठी ही गौरवाची बाब असुन आदिवासी समाजाची महिलाही देशाची राष्ट्रपती होऊ शकते हीच या देशाच्या लोकशाहीची सुंदरता आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

 

भारत हा सर्वधर्मीय लोकतांत्रिक देश आहे. या देशात जाती, धर्माच्या आधारे नाही तर कर्तुत्वाच्या आधारावर सदर व्यक्तीचे मुल्यांकन केल्या जाते. आज राष्ट्रपती पदाच्या निवडीतुन पुन्हा एकदा याचा प्रत्यय जगाने अनुभवला आहे. आदिवासी समाज हा नेहमी दुर्लक्षित राहिला ही वस्तुस्थिती आहे. या समाजाला प्रकाश झोतात आनत समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एनडीए ने राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा आदिवासी चेहरा समोर केला होता. आणि आज त्या निवडुनही आल्यात. चंद्रपूर हा गोंड राज्याचा जिल्हा आहे. आदिवासी समाजाची संख्या येथे अधिक आहे. त्यामुळे चंद्रपूरसह देशातील आदिवासी समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य झोतात आणण्याने निश्चीतपणे त्यांच्याकडून प्रयत्न होतील अशी अपेक्षा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली असुन त्यांच्या नेतृत्वात देश प्रगतीचे नवे शिखर गाठेल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here