आमदार किशोर जोरगेवार यांनी केली ग्रामीण भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी
नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना
धरणाचे पाणी सोडल्याने ग्रामीण भागातील अनेक गावे पुराच्या पाण्याने प्रभावित झाली आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर गावांची भेट घेत पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी तात्काळ पंचनामे करून नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. यावेळी तहसीलदार निलेश गौंड यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चंद्रपुरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणे तुडूंब भरलेली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आली आहे. परिणामी शहरीं भागासह ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण भागाची पाहणी केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी बेलसनी, घूग्घुस आणि पिपरी या गावांना भेट दिली. बेलसनी येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीतही काही नागरिक गावात असल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या आहे. तर प्रशासनाने येथे पोलिसांची तैनाती करावी, पाणी वाढल्यास ग्रामस्थांंना बाहेर काढण्यासाठी बोट उपलब्ध करावी आदी सूचना केल्या आहेत. तर येथील काही गावकऱ्यांची व्यवस्था मुरसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आली आहे.
येथील सोयी सुविधांचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून येथील नागरिकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर घुग्गुस येथील काही भागातही पाणी शिरल्याने जनजीवन प्रभावीत झाले आहे. येथील नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी तहसीलदार यांना केल्या आहे. तर पिपरी येथील शेतातही पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यावर येथील पंचनामे करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. मारडा येथेही पुलाचे पाणी शिरल्याने शितपिकांचे मोठे नुकसान झाले. यासर्व भागाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहे.
पूरपरिस्थितीवर आमचे लक्ष असून अनेक भागात मदत कार्य सुरू आहे. प्रशासनासह यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते ही मदत कार्य करत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण युवा नेते इमरान शेख, घुघुस शहर संघटक विलास वनकर, अल्पसंख्याक विभागाचे राशेद हुसेन, पिपरीच्या सरपंच वैशाली मातणे, अरुण तुरणाकर, पारस पिंपळकर, चंदू मातने यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.