जल जीवन मिशन अंतर्गत गावात जनजागृती
जिवती : जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरमी येसापूर येथे ‘जल जीवन मिशन‘ जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पाणी संवर्धन व पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच ग्रामपंचायतची पाणीपट्टी भरण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जिवती तालुक्यातील अमलबजावणी साहाय्य संस्था अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उप्परवाही यांनी जिल्हा परीषद शाळेतील मुलांची प्रभातफेरी काढून हातात फलक घेऊन तसेच पाणी संवर्धनाचे नारे म्हणत गावात दवंडी पिटली व यातुन लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले.
हा कार्यक्रम अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांतजी कुंभारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडला, यावेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे वरिष्ठ समाजशास्त्रज्ञा किशोर हजारे , चंदू जाधव स्वच्छ भारत मिशन जिवती, शाळेचे मुख्याध्यापक लिंगवरव सोयम व सहायक शिक्षक पडवेकर तसेच श्रीनिवास पवार, अंकुश खडसे, पल्लवी भेसुरवार, ऋतुजा गौरकर, गायत्री नांदलवार आदी उपस्थित होते.