साहेब! शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करा

0
760

साहेब! शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करा

नांदेड जिल्हाचे भुमिपुत्र प्रमोद पाटील मनुरकर यांची शरदचंद्रजी पवार साहेबांना विनवनी

 

उमरी :- देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना नांदेड जिल्हाचे भुमिपुत्र प्रमोद पाटील मनुरकर यांनी भेट घेतली व विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली यावेळी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी चालु असुन पुर परिस्थिती निर्माण होत आहे. व अनेक शेतकऱ्यांची पिके गुरे ढोरे वाहुन गेले असुन शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी चालु आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असुन शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे परंतु नव्यानेच सत्तेवर आलेल्या सरकारकडून मदत मिळेल की नाही हि चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. गोदावरीच्या काठावर असलेल्या शेतातील मातीसुद्धा वाहुन गेली. शेतकऱ्यांसमोर जगायचे कसे हा खुप मोठा चिंताजनक प्रश्न उभा आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी केंद्र सरकार व राज्य सरकारला धारेवर धरुन मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती मनुरकर यांनी केली आहे.

 

यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिषभाऊ चव्हाण,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलासराव पाटील, राजेशभैय्या टोपे,अंकुशराव कदम,युवक जिल्हाध्यक्ष भाउसाहेब पाटिल तरमळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here