निवडणूक सामोर असताना एकीकृत चा नारा ‘षडयंत्र’ – अश्विन मेश्राम

0
823

निवडणूक सामोर असताना एकीकृत चा नारा ‘षडयंत्र’ – अश्विन मेश्राम

वंचित बहुजन आघाड़ी

 

प्रत्येक वेळेला निवडनुक आली की एकीकृत ची भाषा समाजात वापरली जाते. या आधी एकीकरण झाले. चार खासदार ही झाले मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता स्वाभिमान गहान ठेवुन लाचारी स्विकारत स्व:हितासाठी सत्तेच्या मागे लोटांगण घालत जाणारे स्वत:ची पोळी शेकण्यात धन्यता मानणारे नेते याच समाजाने उघड्या डोळ्यानी पाहीले.

 

दरवेळेला कुठलीही निवडनुक येई पर्यत एकीकृत ची भाषा वापरली जात नाही. मात्र कुठलीही निवडनुक आली की बोंब उठवली जाते… कारण बौद्ध समाज एक संघ एका आंबेडकरवादी पक्षासोबत गेला तर बौद्ध समाजाला त्यांची राजकीय शक्ती कळेल आणि सत्तेत वाटा मागेल. ही भिती बाळगुन रिपब्लिकन एकीकृत चा नारा देत समाजात षडयंत्र रचीले जाते आणि बौद्ध समाजाचे मतदान फोडण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी कडुन होते.

 

या पासुन वेळीच बौद्ध समाजाने तसेच शाहू फुले आंबेडकरी विचार समूहाने सावध होऊन महाराष्ट्रा मध्ये राजकीय सत्तेपासुन वंचित असलेल्या घटकाला न्याय मिळवुन देण्यासाठी मा. बाळासाहेब आंबेडकर सक्षमपने अहोरात्र झटत असल्यामुळे येणा-या नगरपरिषद, नगरपालिका, महानगर पालिका, आणि जिप, पस च्या निवडनुकी मध्ये एकसंघ होऊन वंचित बहुजन आघाड़ी सोबत राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ी चे अश्विन मेश्राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here