चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष यांचा सोशल मीडिया पोस्ट ठरला चर्चे चा विषय
राजुरा :- आषाढी एकदशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने हा दुर्मिळ योगायोग या वर्षी बघायला मिळाला आहे.
आजचा दिवसाचे औचित्य साधत पंढरपूर येथील मुस्लिम बांधवानी एकतेचे प्रतीक दाखवत आपले दुकान बंद ठेवत कोणताही प्रकारची कुर्बानी न देता येणाऱ्या वारकरी बांधवांचे स्वागत करून बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर असाच कौतुकास्पद निर्णय पुण्यातील भोरमधील मुस्लिम समाजातर्फे अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.आषाढी एकादशी दिवशी ईद नमाज पठण करून, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कुर्बानी देण्याचा निर्णय मुस्लिम समाजानी घेतला आहे. या बातम्या समज माध्यमातुन प्रसारित झाल्या असून यातून हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन दिसून आले आहे.
असाच काही सा प्रकार राजुरात देखील निदर्शनास आला आहे. महाराष्ट्र भर सोशल मीडिया चा माध्यमातुन आषाढी एकादशी व बकरी ईद चा वेगवेगळ्या शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे.
मात्र चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद एकच फोटो पोस्ट करत एकतेचा संदेश दिल्याने समाज माध्यमात एक सकारात्मक चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे.