मनसे माजी यूवक तालुका अध्यक्ष सूरज भांबेरे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

0
961

मनसे माजी यूवक तालुका अध्यक्ष सूरज भांबेरे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

निवडणूकच्या रणधुमाळीत वंचित कडे उमेदवारांचा वाढता कल

राजुरा : सूरज विजय भांबेरे माजी यूवक तालुका अध्यक्ष मनसे यांनी काल दिनांक 21/06/2022 ला प्रभारी राजेश बोरकर आणि जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी शाखा राजुरा येथे पक्ष प्रवेश केला.

शाहू फुले आंबेडकरी विचारधारा मानणारा युवक भोंग्याच्या विषयावर राज्यात वातावरण तापले असल्यामुळे विचारधारेला न पटल्याने मनसे ला राजीनामा देऊन वंचित मध्ये प्रवेश घेतला आहे.

नगर परिषद राजुरा निवडणूकीचे बिगुल वाजले असल्याने काल शहरातील इच्छुक 50 उमेदवार काल मुलाखतीसाठी आले होते. वंचित बहुजन आघाडी चा वाढता कल इतर पक्षांना चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.

 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश लिंगमपल्लीवार, जिल्हा सचिव अमोल राऊत, जिल्हा महिला पदाधिकारी निशा ठेंगरे व अल्का मोटघरे तसेच तालुका कार्यकारणी अध्यक्ष सुशील मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, विजय जुलमे, महासचिव सदानंद मडावी, कार्याध्यक्ष सुभाष हजारे, राजू जुलमे, सच्चीदानंद रामटेके, किशोर रायपूरे, प्रभुदास वनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here