जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात
राज्यातील गट-ड (चतुर्थ श्रेणी) महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 20 जून ते 28 जून पर्यंत आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना सक्रिय सहभागी होत आहे असे आव्हाहन राज्याध्यक्ष श्री.अतुल मूळे व राज्यसचिव श्री.पंकज गोरले यांनी केले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाच्या ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वच जिल्हा परिषद कार्यालयातून व शेवटी ग्रामविकास मंत्री हसन मुंश्रीफ यांच्या निवस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
यात 20ते 21 जून काळी फित लावून निषेध नोंदविणे. 22 जून ला भोजनकाळात सर्व जिल्हास्तरीय मुख्यालयासमोर निदर्शने. 23 जून ला एकदिवसीय लाक्षणिक संप करून यावर तोडगा न निघाल्यास 28 जून रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुंश्रीफ यांच्या कोल्हापूर कागल येथील निवस्थानासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हाहन जिल्हा प्रतिनिधी उमाकांत ठाकरे जिल्हा अध्यक्षा सुवर्णा सुखदेवें तसेच सचिव कपिल वैद्य यांनी केले.