विद्यार्थी तरुणांनी अहिंसक व शांततेत आंदोलन करण्याची अजय दुर्गे यांची विडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल…
सध्या देशात ‘अग्निविर’ ची बरीच चर्चा रंगली असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी विद्यार्थांतून केली जात आहे. तर देशात काही ठिकाणी आंदोलने होत असून हिंसक वळण लागत असल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद चंद्रपुर शहरातही उमटले असून येत्या 20 तारखेला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे या आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन पार पाडावे. कोणतीही हिंसक घटना घडणार नाही किंवा अशा घटना घडवणाऱ्या समाजकंटकापासून सावध राहून आपले भविष्य सुरक्षित ठेवावे, अशा सामाजिक संदेशाची अजय दुर्गे यांची पोस्ट सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
‘त्या’ वायरल पोस्ट ची ही लिंक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02KMYX7VgRbWo85Mz9SFoiMAp2qpc1z18VXSbxtkLQfef3hiNLx965dZXPFmiNQAuWl&id=100003631030433&sfnsn=wiwspwawes
‘त्या’ वायरल पोस्ट मध्ये अजय दुर्गे काय बोलले ते तुम्ही स्वतः बघू शकता…
मोर्चा/आंदोलनात सहभागी युवक विद्यार्थ्यांनी न्याय्य व संवैधानिक मार्गाने शांततेत आंदोलन यशस्वी करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रामुख्याने नियोजनकर्त्यांनी हिंसक वळण लागून आंदोलनाला गालबोट लागणार नाही, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही याची दक्षता बाळगावी. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होऊन ते गुन्हेगार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच या कंत्राटी पदभरतीने विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात काय करावे…? ऐन उमेदीच्या वयात तीन-चार वर्षे नोकरी केल्यास पुढे काय करायचं…? असाही प्रश्न दुर्गे यांनी या वेळी बोलताना उपस्थित केला आहे. त्यांच्या या संदेशाचे समाज माध्यमावर कौतुक होत असून त्यांच्या या सजग कार्याला सलाम केला जात आहे.