हसन रुबाब जमादार यांचे सामाजिक कार्य नदिची केली साफसफाई

0
596

रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा गावातील समाजसेवक,सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ओळखले जाणारे हसन रुबाब जमादार यांनी लोहारा येथील सुकी नदीतील साफसफाई,स्वच्छता करण्याचा तीन दिवसीय उपक्रम हाती घेतला आहे,याबाबत अधिक माहिती अशी की,लोहारा येथील समाजसेवक हसन जमादार हे सदैव सामाजिक कार्यासाठी कोणतेही कार्य असो हसन जमादार यांचा प्रथम सहभाग सामाजिक,सार्वजनिक कार्यात नेहमी असतो,,तसेच सद्ध्या स्थितीत त्यांनी लोहारा येथील सुकी नदीला नेहमी पुर येतो,आणि या पुरामुळे लोहारा येथील सुकी नदीचा पुल लहान अरुंद असल्याने या पुलाजवळ सातपुडा जंगलातुन वाहत आलेली झाडे,झुडपे या पुलाच्या पाईपांमधे अडकुन पडतात,यामुळे सुकी नदीचे पाणी हे पुलावरुन वाहते,अाणि या पुलावर जागोजागे मोठमोठे खड्डे असल्याने परिसरातील जनतेला रहदारीला खुप अडथळा निर्माण होऊन कुसूंबा आणी लोहारा गावासह अनेक गावांचा संपर्क तुटतो,कधी-कधी तर पुराचे पाणी जास्त आल्यास या पुलावर गुरे-ढोरांसहित मानवी जिवितहानी देखील होणे नाकारता येत नाही,ही सगळी परिस्थिती लक्षात घेत समाजसेवक हसन जमादार यांनी सुकी नदीतील झाडे,झुडपेंची साफसफाई करण्याचा 3 दिवसीय उपक्रम सुरु केला आहे,त्यांच्या ह्या मेहनती कार्यामुळे,आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,सरपंच,महिला व गावकऱ्यांकडुन कौतुक केले जात आहे,कारण आजपासुन सलग तीन दिवस हा साफसफाईचा उपक्रम सुरु राहणार म्हणजेच 22 सप्टेंबर पर्यंत हसन जमादार हे लोहारा येथील सुकी नदीतील साफसफाईचे काम स्वतः मेहनत करुन सुकी नदीतील साफसफाई करीत आहेत.या प्रसंगी हसन जमादार यांच्या सोबत कादर तडवी,पिरखा तडवी,जुम्मा तडवी यांचे सहकार्य लाभले,हसन जमादार यांच्या ह्या कार्यामुळे सगळीकडे कौतुक केले जात आहे.

 

विशाल सुरवाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here