भाजप NGO आघाडीच्या वतीने जागतिक परिचारिका दिननिमीत्ताने परिचारिकांचा गौरव
भाजप NGO आघाडीच्या वतीने आमदार सिध्दार्थजी शिरोळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सुचनेप्रमाणे जागतिक परिचारिका दिननिमीत्ताने शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटल मधील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर्सच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका भगिनींचा गौरव करण्यात आला.
कोविडच्या काळासह इतर कठीण काळातही रुग्णांसह आपल्या कार्यातून स्नेहबंध जपणाऱ्या २५ परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. सन १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेने आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो.
यावेळी शहर समन्वयक दत्तात्रय सोनार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली जाधव, डॉ. भीमसिंग राजपूत यांच्यासह परिचारिका कुसुम भैरवकर, कांता मरभळ, रुपाली चिंबळकर, सुवर्णा वंटे, मिरा शिंदे सह आदी प्रमुख सहकार्याच्या उपस्थितत कार्यक्रम पार पडला.