बंद रोहीत्राला झाला महीना,शेतकरी झाला केवीलवाणा
:सावरी येथील रोहीत्र बंद अवस्थेत
बोथली:एकीकडे शेतकर्याचे उत्पन्न दुपट्ट करु असे शासन सांगत असतांना,दुसरीकडे महीनाभर रोहीत्र बंद असल्यामुळे शेतकरी पीकाला सींचन कसा करणार,वेळेवर पीकाला पाणी नाही मिळाले तर उत्पन्न कसं वाढेल.चीमुर तालुक्यातील सावरी येथील खानगाव ते सावरी रस्तयालगत निखाडे यांच्या शेतात असलेले रोहीत्र गेल्या एक महीन्यापासुन बंद अवस्थेत आहे,याबाबत शेतकर्यांनी महावीतरणच्या अभीयंत्याकडे वारंवार तक्रार केली मात्र अद्याप नवीन रोहीत्र लावण्यात आले नाही,त्यामुळे आणखी कीती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न शेतकरी करीत आहे.
या रोहीत्रावर सहा शेतकर्यांची वीज जोडणी आहे.यावर्षी सोयाबीन पीकावर विवीध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 20-30 टक्के उत्पन्न हाती येणार आहे.काही शेतकर्यांची सोयाबीन पीकाची कापणी झाली आहे,तर काही जणांचे कापणीला आले आहे.खरीप हंगामातील पीक तर गेलेच,आता रबी हंगामात हरभरा तरी चांगला पीकेल या आशेवर शेतकरी आहे.
हरभर्याची पेरणी करन्यापुर्वी जमीनीची मशागत करुन,एक पाण्याची पाळी द्यावी लागते.मात्र रोहीत्र बंद असल्यामुळे शेचकर्यांचा मोटर पंप बद आहे.तरी तत्काळ नवीन रोहीत्र लावुन द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.
रोहीत्राची मागणी वरोरा येथील कार्यालयाकडे केली आहे,मात्र 25 के.वी. चे रोहीत्र उपलब्ध नसल्यामुळे रोहीत्र लावण्यात आले नाही,उपलब्ध झाल्यानंतर लावण्यात येईल.
आर. के. सींह
कनीष्ट अभीयंता
महावीतरण, उपकेंद्र ,चारगाव (बुज)बोथली प्रतीनीधी,गजानन उमरे