दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशनच्या माध्यमातून पंचायतराज एक दिवसीय महिला प्रशिक्षनाचे आयोजन
दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारशा यांच्या माध्यमातून दिनांक 27/04/2022 या एक दिवसीय पंचायतराज प्रशिक्षण दिलासाग्राम सेंटरला घेण्यात आले, या प्रशिक्षणामध्ये बल्लारशा तालुक्यातील दहा गावांनमधून महिलांना बोलावण्यात आले, यामध्ये एकूण 59 महिला प्रशिक्षणात हजर होत्या. या प्रशिक्षणामध्ये महिलांचे अधिकार, हक्क, जबाबदार्या, शिक्षन,कायदे, राजकीय क्षेत्रात महिलांचे स्थान कसे निर्माण करता येणार याबद्दलचे प्रशिक्षण घेण्यात आले.
दिलासाग्राम संस्थेचे संचालिका सिस्टर जया व सहसंचालिका सिस्टर विवियाना यांच्या नियोजनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. तर दिलासाग्राम संस्थेचे समन्वयक मीनाक्षी तेलंग फिल्ड ऑफिसर नीलकंठ सरवर, रजनीकांत चांदेकर हे मार्गदर्शक होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा बजाइत तर आभार प्रदर्शन सुवर्णा वासाडे यांनी पार पाडले.
सिस्टर जया या वेळेस महिलांना संबोधित करताना महिला आपले अधिकार व हक्क घेण्यासाठी प्रत्येक वेळेस ग्रामसभेला जाणे गरजेचे आहे. व आपला प्रश्न तिथे मांडणे आणि लोकांचे प्रश्न सुद्धा घेऊन चर्चा घडवून आणणे. यामध्ये विकासात्मक कामे करणे, लोकांना जाणीव जागृती होणे, प्रत्येक महिला बचत गटामध्ये आहेत, प्रत्येक महिलांनी महिला ग्रामसभेमध्ये जाणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शन देण्यात आले.
तर सिस्टर विवियांना आपल्या मार्गदर्शनातून लोकांना संबोधित करताना प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामे करीत आहे. तर ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त पुरुष लोक जातात आणि महिलांची संख्या कमी असते, हि संख्या भरून काढण्यासाठी प्रत्येक महिला आज बचत गटामध्ये आहेत, प्रत्येक बचत गटातली अध्यक्ष,सचिव यांनी आपल्या बचत गटाला मजबुतीकरण करून आपल्या गावातील ग्रामसभेला जाऊन. महिला ग्रामसभा पूर्ण करावे, असे बोलण्यात आले.
मीनाक्षी मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना बचत गटाचे महत्त्व, बचतीची सवय, गटाचे फायदे, महिलांचे सबलीकरण, बचत गटातील पैशाचा मोठा व्यवहार, गटातील सामुदायिक व्यवसाय कसा करीत आहेत व तो बदल कसा दिसून येत आहेत. याबद्दल चे मार्गदर्शन देण्यात आले ….
तर नीलकंठ सर आपल्या मार्गदर्शनातून त्रिस्तरीय पद्धत 73 वी घटनादुरुस्ती या कायद्यामध्ये महिलांचे विशेष मोठा स्थान मिळालेला आहे, यामध्ये पुरुषांसोबत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालेले आहे. आजची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा आपली जागा बनवलेली आहे. परंतु ग्रामीण भागातील महिला राजकीय शेत्रात भाग घेणे व सहभाग नोदविने हे कमी दिसते.
रजनीकांत सर यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना ग्रामपंचायत , महिला ग्रामसभा, पंचायत राज, पंचायत विभाग, जिल्हा परिषद विभाग या शेत्रामध्ये महिलांनी भाग घेतला पाहिजे, आपला गाव आदर्श बनवण्याकरिता महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे, महिलांना संपूर्ण प्रशिक्षण प्रोजेक्टर वर देण्यात आले, पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यानी आपला गाव कसा बदलवला व आदर्श गाव कसा करण्यात आला हे प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ महिलांना दाखवण्यात आले.
अशाप्रकारे सेवाभावी संस्था दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन बल्लारशा हे गावांमध्ये जाऊन महिलांना व इतर घटकांतील लोकांना मोठ्या झपाट्याने मार्गदर्शन देऊन लोकांना जाणीव जागृती करून देत आहे.