‘आप’च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांना भीती
आपचे होर्डिंग्ज बॅनर चोरणाऱ्या त्या अज्ञात विकृत व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी आप चे शहर सचिव राजू कुडे यांची मागणी
सिटी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या जूनोना चौक झांसी राणी ब्रीज येथे तथा महादेव मंदीर समोरील परिसरात आम आदमी पार्टी चे प्रचाराचे बॅनर लावले होते.
असे एकूण 12 हजाराचे 4 बॅनर (लोखंडी फ्रेम सहित) विकृत मानसिकतेच्या लोकांनी नेल्याने बाबुपेठ परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या वरती आपचे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की आम आदमी पार्टी ही जनसामान्यांचा आवाज बनली असून बाबूपेठ प्रभागात अनेक कामे आप तर्फे होत आहे तसेच पक्षाला चांगली पसंती मिळत आहेत. यामुळेच विरोधकांची झोप उडालेली असून आप ला रोकण्याकरिता लोकवर्गणीतून लावलेले आपचे बॅनर विरोधकांकडून चोरण्यात आले आहे. विरोधकांची ही करतुत अशोभनीय असून पोलिस प्रशासनाने त्या संबधित अज्ञात व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये.अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आप तर्फे करण्यात आले.
यावेळेस आपचे शहर सचिव राजू भाऊ कुडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप भाऊ तेलतुंबडे, महिला शहर संघटन मंत्री सुजाता ताई बोदेले, कालिदास ओरके, वीरू भाऊ खोब्रागडे, जयंत थूल, जय देवगडे, निखील बारसागडे, सुनील पचारे, सागर बोबडे, प्रवीण चुनारकर, संस्थापक सदस्य चंदु भाऊ माडुरवार, सुशांत धाकाते, नितिन कामतावर, महेश सिंह पाजी, विनोद भाऊ रेब्बावार इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.