तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथे अभ्यासीकेसह 50 लक्ष रुपयांचा निधी देणार – आ. किशोर जोरगेवार

0
838

तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथे अभ्यासीकेसह 50 लक्ष रुपयांचा निधी देणार – आ. किशोर जोरगेवार

तुळसी नगर विकास समीतीचा चौथा वर्धापण दिन साजरा

 

 

वाढत्या लोकसंख्येसह चंद्रपूर शहराचाही विस्तार होत असल्याने अनेक नविन वस्त्या निर्माण झाल्या आहे. या वस्त्यांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. तुळसीनगर, राष्ट्रवादी नगर आणि वृंदावन नगर येथील सोयी सुविधांसाठी आपण 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असून नागरिकांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास येथे अभ्यासिकेसाठीही आपण निधी देऊ असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तुळसीनगर वासियांच्या वतीने तुळसीनगर विकास समिती तर्फे चौथा वर्धापण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला तुळसीनगर विकास समितीचे अध्यक्ष ए.एन देवताळु, उपाध्यक्ष दौलत रामटेके, सचिव अनिल देवतळे, कार्याध्यक्ष अनिल माथनकर, सहकार्याध्यक्ष दिवाकर पाल, कोष्याध्यक्ष राहुल निमगडे, संघटक नशीम, प्रसिध्दी प्रमुख रविंद्र सोनेकर, सहसंघटक वरारकर, कमलेश तोडे, रमेश वनकर, यंग चांदा ब्रिगेडच्या तुळशीनगर संघटिका शांता धांडे, यंग चांदा ब्रिगेडचे संघटक दिनेश इंगळे आदिंची उपस्थिती होती.

 

यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर शहरातील अनेक भागांचा अद्यापही अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे या भागांचा विकास व्हावा या करिता आपले प्रयत्न सुरु आहे. कोरोना काळात आमदारांच्या निधीमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. असे असतांनाही विविध विभागा अंतर्गत शहराच्या विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतुन दुर्लक्षित राहिलेल्या भागांचा विकास केल्या जात आहे. इंदिरा नगर, क्रिष्णा नगर, संजय नगर, बाबुपेठ या शेवटच्या भागात आपण मोठ्या प्रमाणात कामे करत आहोत, तर राष्ट्रवादी नगर, वृंदावन नगर आणि तुळशीनगर येथील कामांसाठीही आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातुन या भागातील रस्त्यांची कामे केल्या जात आहे. हा सर्व भाग अकुषक झोन मध्ये असल्यामुळे येथील नागरिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे हा भाग कुषक झोनमध्ये करण्याच्या दिशेनेही महानगर पालिकेशी पाठपुरावा सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरीता दूरवर जावे लागते ही बाबही माझ्या लक्षात आहे. त्यामुळे आपण येथे जागा उपलब्ध करुन दिल्यास अभ्यासिकेकरिता निधी देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या भागात रस्ता आणि नाल्यांची मोठी समस्या आहे. त्यामुळे या भागात मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता आपण 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचीही घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here