अवैध गौण खनिज चोरणाऱ्या शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखांचा पत्रकारावर भ्याड हल्ला…
● अवैध वाळू तस्करीचे वृत्त प्रकाशित केल्याचा राग
● दिमतीला जिल्हा प्रमुख…
वणी : तालुक्यातील कोळसा खाण व अवैध वाळू उपसा सोबतच मुरुमाची चोरी करणाऱ्या तालुका प्रमुख व साथीदारांनी पत्रकाराला शीत पेय पिण्यासाठी बोलावून मागून हॉकी स्ट्रिक ने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार च्या सुमारास नांदेपेरा मार्गावर घडली आहे. यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र गुन्हा नोंद केला नसल्याची माहिती आहे.
वणी शहरात नांदेपेरा मार्गावर पत्रकार रवी ढुमणे हे कार्यालयीन कामासाठी तहसील कार्यालयात गेले होते. कार्यालयीन काम आटोपून घराकडे येत असताना त्यांना थंड पेय घेऊ म्हणून एकाने पाचारण केले. थंड पेय घेतल्यानंतर रवी ढुमणे हे आपल्या दुचाकीवर बसले आणि निघत असतांना शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गणपत लेडांगे हे आपल्या साथीदारांसह आले आणि त्यांनी मागून हॉकी स्ट्रिक ने वार केले. प्रसंगी बचाव करण्यासाठी पत्रकार रवी ढुमणे यांनी हॉकी स्ट्रिक चे वार हातावर झेलून प्रतिकार करीत मुलाला फोन लावला. मात्र माजी तालुका प्रमुख असलेला नेता नतमस्तक झाला. यासंबंधी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आता सत्तेच्या सरीपटात हे स्वतःला नेते म्हणवून घेणारे गौण खनिज चोरटे हत्या करण्याच्या दृष्टीने आपले पंटर वापरताना दिसते आहे. यात जिल्हा प्रमुख असलेल्या नेत्याने पत्रकार रवी ढुमणे ला दोनदा फोन केले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती आहे. एकूणच शिवसेनेची सत्ता असल्याने सत्तेचा दुरुपयोग करीत या स्वयंघोषित नेत्यांची मुजोरी वाढली आहे. केवळ सामान्यांच्या समस्या ऐकून घेण्यात या पांढरपेशी पुढाऱ्यांना रस नसल्याने प्रशासन हतबल होत आहे. मात्र वार करून माजी तालुका प्रमुखाने कायर गाठले असल्याची माहिती आहे. यात त्याला सुद्धा धु धु धुतला असल्याची शहरात खमंग चर्चा आहे.