संगमनेर च्या वैभवात भर टाकणाऱ्या मल्टीप्लेक्स व अद्यावत मॉल चे ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते भूमिपूजन…
संगमनेर : शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या मॉल व मल्टिप्लेक्स चे भूमिपूजन काल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गंगा सृष्टी, गुंजाळ वाडी येथे सायंकाळी पार पडले. या कार्यक्रमास बी व्ही जी ग्रुप चे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, नाशिक पदवीधर चे आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी चे नेते अशोक भांगरे, गुंजाळ वाडी च्या सरपंच वंदना गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक अध्यक्ष कपिल पवार, नवनाथ अरगडे, काँग्रेस चे अध्यक्ष बाबा ओहळ, अनिल देशमुख, सानप आदी उपस्थित होते.
संगमनेर शहरातील विकास चौफेर होत असून गुंजाळ बंधूंनी उचलेले पाऊल हे धाडसी आहे. संगमनेर शहरातील पर्यटन वाढीस या प्रक्लप ने चालना मिळणार असून स्पर्धेच्या युगात याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर शहराचा विकास आखाडा तयार असून रस्ता बांधणी बाबत त्यांनी शेतकरी वर्गाने मदत करावी. रस्ता रुंदीकरण ही काळाची व भविष्याची प्रगतीची चावी आहे. या मुळे शेती उद्योग धंदा यास चालना मिळते. रस्ता रुंदीकरण बाबत भरपूर निधी देऊ असे ही त्यांनी सांगितले. सिन्नर या शहराचा कायापालट होत आहे. सिन्नर मधील रस्त्यांचे जाळे, पुणे नाशिक रेल्वे संगमनेरचा चेहरा बदलेल. या बदलास सर्वांनी सहकार्य करावे असे ही ते म्हणाले. शेती व व्यापार यांना सिन्नर येथील रस्ते आधिक उपयोगी पडणार असून पूर्ण देशात या मुळे संपर्क होणार आहे. गुंजाळ बंधूंचे त्यांनी या वेळी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगा सृष्टी चे संचालक विशाल गुंजाळ यांनी केले तर कौटंबिक मनोगत नवनाथ अरगडे यांनी मांडले. डॉक्टर सुधीर तांबे, हनुमंत गायकवाड, दुर्गा तांबे यांनी ही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी या कार्यक्रमास केली होती.